Gomantak Bhandari Samaj Dispute  Dainik Gomantak
गोवा

Bhandari Samaj Goa: भंडारी समितीच्या सुनावणीवेळी गोंधळ! काही जणांना कक्षाबाहेर काढण्याची मागणी; जिल्हा निबंधकांसमोर नाट्य

Gomantak Bhandari Samaj Dispute: समाजाच्या समितीच्या वकीलांनी निबंधकांकडे विरोधी गटातील काहींना बाहेर काढा, अशी मागणी केल्याने एकच गोंधळ उडाला आणि उपस्थितांनी वकीलांच्या मागणीचा समाचार घेतला.

Sameer Panditrao

पणजी: गोमंतक भंडारी समाजाची वैध समिती कोणती याविषयावरील खटल्याची सुनावणी जिल्हा संस्था निबंधकांसमोर झाली नाही पण काही जणांना कक्षाबाहेर काढण्याच्या मागणीवरून नाट्य घडले.

समाजाच्या समितीच्या वकीलांनी निबंधकांकडे विरोधी गटातील काहींना बाहेर काढा, अशी मागणी केल्याने एकच गोंधळ उडाला आणि उपस्थितांनी वकीलांच्या मागणीचा समाचार घेतला. तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले, की सुनावणी विरोधी पक्षाचे वकील उपस्थित नसल्याने पुढे ढकलण्यात आली. ती आता १० रोजी होणार आहे.

या सुनावणीवेळी गोमंतक भंडारी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनावणी ऐकण्यासाठी आलेले समाजाचे अध्यक्ष उपेन्द्र गावकर व प्रवक्ते संजिव नाईक आणि इतर पदाधिकारी यांना बाहेर काढावे अशी मागणी विरोधी गटाचे वकील हनुमंत नाईक यांच्या सहाय्यक वकिलांनी केली.

समाजाचे प्रवक्ते संजिव नाईक यांनी या विधानाला आक्षेप घेत हा समाजाचा खटलाआहे, मी समाजाचा सभासद आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही जातो. तेथे कोणी अडवत नाही मग येथेच कोणत्या नियमांतर्गत अडवणार अशी जोरदार विचारणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT