Gomantak Bhaktisandhya Dainik Gomantak
गोवा

Gomantak Bhaktisandhya : मांद्रेत मधुर स्वरांची बरसात; रसिक चिंब

‘भक्तिसंध्या’ला प्रतिसाद : गोमन्तकतर्फे आयोजन, डॉ. प्रवीण गावकर टीमने मिळवली वाहवा

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhaktisandhya : गोव्यातील आघाडीचे वृत्तपत्र दै. गोमन्तक आणि कला व संस्कृती संचालनालयाच्यावतीने आयोजित भक्ती संध्या या कार्यक्रमात डॉ. प्रवीण गावकर आणि साथींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

मांद्रे येथील दीनदयाळ सभागृहात हा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या संगीतमय कार्यक्रमात गोव्यातील प्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गावकर तसेच गायिका पल्लवी पाटील, सिया पै, अश्विनी अभ्यंकर यांनी बहारदार भक्तिगीते सादर केली. संपूर्ण वेळ त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले.

प्रारंभी श्री गणपती स्तवन, विश्वाचे आर्त माझ्या (पल्लवी पाटील), ‘विठू माऊली तू, माऊली जगाची'' (आश्विनी अभ्यंकर), ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा'' (सिया पै), ''पंढरपूरचा विठोबा लावण्याचा’ (डॉ. प्रवीण गांवकर),''कमोदिनी काय जाणे परिमळ'' (पल्लवी पाटील), परदेस सजणा का धरिला (अश्‍विनी अभ्यंकर),

पद्मनाभ नारायणा (सिया पै), सजन नयन एक बा, ''मिले सूर मेरा तुम्हारा'' या एकापेक्षा एक सादरीकरणानंतर ‘अवघा रंग एकच झाला'' या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

खुमासदार सूत्रसंचालन

या संगीत कार्यक्रमासाठी उत्पल सायनेकर (तबला), किशोर तेली (पखवाज), योगेश रायकर (मंजिरी), धनराज मडकईकर (संवादिनी) यांनी जबरदस्त साथसंगत दिली. या साथींनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोविंद भगत यांनी खुमासदार शैलीत केले.

आज वाळपईत रंगणार मैफल

दैनिक गोमन्तक आणि कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे वाळपई येथील लक्ष्मी मेमोरियल सभागृहात संध्याकाळी ६ वा. ‘भक्ती संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाळपई नगराध्यक्षा शैहजीन शेख, माजी आमदार नरहरी हळदणकर, सत्तरी अर्बन कॉ ऑप क्रेडिट सोसायटीचे चैरमन वासुदेव परब, नगरगाव

सरपंच संध्या खाडिलकर व गोमन्तकचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे. सूत्रसंचालन गोविंद भगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलाने उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक, ‘गोमन्तक’चे मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय, प्रशासन) सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरुण पाटील आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT