Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Dhargalim Gold Theft Case: धारगळ येथे २३ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोने, रोख रक्कम घेऊन फरारी असल्याच्या आरोपावरून पेडणे पोलिसांनी एका सोनारावर गुन्हा दाखल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dhargalim Gold Cash Theft Case

पेडणे: धारगळ येथे २३ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोने, रोख रक्कम घेऊन फरारी असल्याच्या आरोपावरून पेडणे पोलिसांनी एका सोनारावर गुन्हा दाखल केला आहे.

धारगळ-पेडणे येथील सोनार रुत्विक पांडुरकर (२२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सप्टेंबर ते नोव्हेंबर यादरम्यान धारगळ येथे राहत असलेला व मूळचा बेळगाव येथील सोनार संशयित राजू याच्याकडे आपणाकडील सोन्याचे जुने दागिने वितळवून नवीन दागिने करण्यासाठी दिले होते.

तक्रारदाराने १८ लाख १६ हजार रुपयांचे जुने सोन्याचे दागिने आणि रोख ५ लाख २० हजार रुपयांचे नवीन सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी संशयिताकडे दिले होते. तसेच याव्यतिरिक्त इतर लोकांनीही अशाचप्रकारे जुने सोन्याचे दागिने वितळवून नवीन दागिने करण्यासाठी संशयिताकडे दिले होते.

या सगळ्याची मिळून किंमत २३ लाख ३६ हजार होते. पेडणे पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लाटले!

Anjuna Music Event Protest: हणजूणमध्ये संगीत महोत्सवावरून स्थानिकांमध्येच जुंपली; भर सभेत तरुणाला धक्काबुक्की; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

SCROLL FOR NEXT