Parcem Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मुँह में राम, बगल में छुरी! साधूच्या वेशात येऊन 8.50 लाखांचे दागिने केले लंपास, सोलापुरातून दोघांना अटक

Goa Theft: चोनसाई, पार्से येथील अमिता अनंत नाईक यांच्या निवासस्थानी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता साधू बनून दोघे आले.

Sameer Panditrao

Goa Parcem Theft Case

मोरजी: पार्से येथील अमिता अनंत नाईक यांच्या घरातील साडेआठ लाख रुपयाचे किमती सोन्याचे दागिने फसवून नेल्याबद्दल विजय शिंदे व भीमराव शिंदे या सोलापूर येथील संशयितांना मांद्रे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दागिने जप्त केले.

चोनसाई, पार्से येथील अमिता अनंत नाईक यांच्या निवासस्थानी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता साधू बनून दोघे आले. आपण देवाचे दूत असल्याचा दावा करत घरात विधी करण्याची विनंती त्यांनी अमिता यांना केली.

देवावरील श्रद्धेने अमिता यांनी विधी करण्यास मान्यता दिली. दोघांनी विधी करण्यास सुरवात केली. त्यावेळी तुमच्याकडे जेवढे दागिने असतील ते देवाला थोड्यावेळासाठी अर्पण करा असे सांगितले. तिने श्रद्धा ठेवून दागिने त्यांच्या हवाली केले.

त्यानंतर सर्व दागिने घेऊन ते पसार झाले. याबाबत अमिता नाईक यांनी मांद्रे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक शेरीफ जेकीस यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून संशयितांचा माघ काढण्यात आला. कोळेगाव मोहोळ रेल्वे स्टेशन, सोलापूर या ठिकाणी या दोन्ही संशयितांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले व गोव्यात आणून रितसर अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT