Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Crime: बागा-कळंगुट येथून 2 लाखाची सोन्याची चेन हिसकावली; राज्यात वाढते प्रकार, अजून दोन गुन्हे नोंद

Gold Chain Snatching In Goa: राज्यात सध्या सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरूच असून बागा-कळंगुट येथे हैदराबाद येथील पर्यटकाच्या गळ्यातील ४० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Gold Chain Snatching In Goa

म्हापसा: राज्यात सध्या सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरूच असून बागा-कळंगुट येथे हैदराबाद येथील पर्यटकाच्या गळ्यातील ४० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली होती.

याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दीपराज दामोदर मुळवी (३६, रा. खोर्ली-जुने गोवे) यास अटक केली. ही घटना रविवार, १७ रोजी पहाटे ४.४० वा.च्या सुमारास घडली होती. फिर्यादी साहील तिवारी (हैदराबाद) हे पर्यटक बागा येथील पर्यटन खात्याच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे जात होते. यावेळी संशयित दुचाकीवरून आला व फिर्यादीच्या गळ्यातील २ लाख किमतीची ४० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पसार झाला होता.

दरम्यान, रविवारी माशेल येथील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हे मंगळसूत्र होते.

या महिलेजवळ दोघेजण दुचाकीवरून आले आणि तिला काही विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, वारखंडे-फोंडा येथेही असाच प्रकार घडला. मात्र, यासंबंधी तशी कोणतीच तक्रार फोंडा पोलिस स्थानकात देण्यात आली नाही. उपलब्ध माहितीनुसार वारखंडे येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून दोघाजणांनी पळ काढला; पण अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT