Tembi-Rai Theft Incident Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: दुचाकीवरुन आले अन् मंगळसूत्र हिसकावून फरार झाले! बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेबरोबर धक्कादायक प्रकार

Tembi-Rai Theft Incident: बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 54 वर्षीय महिलेचे अंगावरील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पळ काढला.

Manish Jadhav

Gold Chain Snatching At Bus Stop Goa Woman Loses 1Lakh Jewelry

मडगाव: बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 54 वर्षीय महिलेचे अंगावरील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पळ काढला. तेंबी-राय येथे भरदिवसा सकाळी 9 वाजता ही खळबळजनक घटना घडली. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राची किंमत 1 लाख 10 हजार इतकी असल्याचे सांगितले जात आहे. सुषमा शिरोडकर असे पीडितेचे नाव आहे.

मायणा कुडतरी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

मायणा-कुडतरी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद केला असून उपनिरीक्षक वेरॉनिक कुतिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. चोरीची ही घटना 10 मार्च रोजी घडली होती. शिरोडकर या एका बँकेत (Bank) ब्रँच मॅनेजर असून त्या बससाठी उभ्या असताना दुचाकीवरुन दोन अज्ञात तरुण तिथे आले. काही कळण्याच्या आत त्यांनी शिरोडकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरुन पळ काढला. शिरोडकर यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी लोक जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे पळून गेले होते.

मधलावाडा-विर्नोडा येथे अशीच चोरीची घटना घडली

काही दिवसांपूर्वी, मधलावाडा विर्नोडा येथूनही अशीच मंगळसूत्र चोरीची घटना समोर आली होती. सुचिता सीताराम नाईक (वय 43) या कामात व्यस्त असताना दोन चोरट्यांनी डाव साधला होता. काही कळाच्या आता चोरट्यांनी सुचिता यांचे मंगळसूत्र लंपास केले. लंपास केलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत दीड लाख रुपये एवढी होती. हे दोन्ही चोरटे काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलने होते. दरम्यान ते दोघेही हिंदीत बोलत असल्याची माहिती नाईक यांनी पोलिसांना दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT