gold biscuits worth 25 lakhs decamp servent suspect arrested from west bengal by goa police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

Goa Crime News: गोव्यात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच, कांदोळीतील सायपेमधून अशीच घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Goa Crime News: गोव्यात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच, कांदोळीतील सायपेमधून अशीच घटना समोर आली आहे. नोकरानेच घरातील 25 लाखांची सोन्याची बिस्किट चोरल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, हा चोरटा परप्रांतीय असून आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.

कांदोळीतील नॅन्सी डायस (वय वर्ष 62) यांनी घरात काम करणाऱ्या नोकराविरुद्ध चोरीची तक्रार नोंदवली. याकूब मोंडल असे या चोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याकूब 25 लाखांची सोन्याची बिस्किट घेऊन पळाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात कळंगुट पोलिसांनी तक्रार नोंदवली.

पोलिस तपासात आरोपी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) असल्याचे समोर आले. त्यानंतर PSI अक्षय पार्सेकर यांचा समावेश असलेले पथक आरोपीच्या शोधात पश्चिम बंगालला गेले. तिथे त्यांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 3 सोन्याची बिस्किटेही (एकूण 300 ग्रॅम वजनाची रु. 25,00,000/) जप्त केली.

संपूर्ण ऑपरेशन कळंगुट पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परेश नाईक, SDPO पर्वरी श्री. विश्वेश करपे आणि एसपी अक्षत कौशल यांच्या देखरेखीखाली पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT