काणकोण: गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या पंच शताब्दी वर्षांच्या पुनरावृत्तीचा योग यंदा ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला. २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील प्रकल्पाचे उद््घाटन करण्यात येणार आहे.
तयारीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा २५ नोव्हेंबरला भेट देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यक्रमाला वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती उपस्थित होते. यंदाही ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला त्याच मठाचे मठाधिपती उपस्थित राहून आशीर्वाद देणार आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती अनुभवायला मिळणार आहे. यावेळी वेगवेगळ्या मठाच्या मठाधिपतीचे समागमन होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला श्री पालिमरू मठाचे विद्याधिश तीर्थ स्वामीजी व त्यांचे पट्टशिष्य श्रीमद् विद्याराजेश्वर तीर्थ स्वामी, त्याचप्रमाणे चित्रापूर मठाचे शंकराश्रम स्वामी, श्री संस्थान गौठपादाचार्य कवळे मठाचे श्रीमद् शिवानंद सरस्वती तीर्थ स्वामी २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत वर्धापनदिनाचा वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आजपर्यंत श्रीराम द्विविजय रथाने १४ नोव्हेंबरपर्यंत ४९ केंद्रांना भेटी दिल्या. आज गोळी येथील श्री व्यंकटरमण देवालयात रथयात्रेचा मुक्काम असणार आहे.
आज पालिमरू मठाधिश व गोकर्ण पर्तगाळी मठाचे श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजीचे समागमन झाले. या समागमन कार्यक्रमात विद्याधिश तीर्थ स्वामीजीचे प्रवचन मठात झाले. यावेळी त्यांनी श्रीराम यांनी सर्व ऐश्वर्य मागे ठेवून वनवास स्वीकारला. जीवनात चांगले गुण, स्मित भाष्य यांच्या जोरावर त्यांनी जनमानसात स्थान मिळविले, असे स्वामींजीनी स्पष्ट केले.
गोकर्ण पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ७७ फूट उंचीच्या श्री रामाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळला येणार असल्याने उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी पर्तगाळला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही कामाचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही कंदवेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स व अन्य उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान व अन्य महनीय मान्यवरांच्या आगमनासाठी हेलिपॅड निर्माण करण्यात आले आहे.
उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान व अन्य महनीय व्यक्तींच्या आगमन व निर्गमन यांचे नियोजन केले. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या आयोजन समितीकडे चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.