Gogol Gulistan Mosque Murder Dainik Gomantak
गोवा

घोगळ खून प्रकरणी मोठी कारवाई! हलगर्जीपणामुळे पोलिस निरीक्षकाची बदली, एएसआय निलंबित; संशयिताने दिली साक्षीदारांना धमकी

Gogol Gulistan Mosque Murder: हलगर्जीपणा दाखविल्याने पोलिस निरीक्षक आल्मेदा यांची तडकाफडकी राखीव पोलिस विभागात बदली केली तसेच साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश पावसकर याला निलंबित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे (४०) याच्या खूनप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सातजणांना अटक केली असली तरी हे प्रकरण हाताळताना फातोर्डा पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखविल्याने या पोलिस स्थानकाचे निरीक्षक नॅथन आल्मेदा यांची तडकाफडकी राखीव पोलिस विभागात बदली केली. तसेच साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) दुर्गेश पावसकर याला निलंबित केले आहे.

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी शनिवारी रात्री हे आदेश जारी केले. सध्या फातोर्डा पोलिस स्थानकाचा ताबा सांगेचे पोलिस निरीक्षक धीतेंद्र नाईक यांच्याकडे दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अटक केलेल्या अक्रम खानने पोलिसांच्या ताब्यात असतानाही फोनवरून साक्षीदारांना धमकी दिल्याने ही कारवाई केली. अक्रमने धमकी देण्यासाठी ज्या मोबाईलचा वापर केला, तो मोबाईल पोलिसांनी फोन जप्त केला आहे.

संशयितांना लॉकअपमध्ये ठेवलेच नाहीत

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून फातोर्डा पोलिस ठाण्यात लॉकअप नसल्याने संशयितांना त्वरित मडगाव पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंदिस्त करावे, अशा स्पष्ट सूचना फातोर्डाचे निरीक्षक नॅथन आल्मेदा यांना वरिष्ठांनी देऊनही रात्रभर त्यांना लॉकअपमध्ये न ठेवता पोलिस स्थानकात खुलेच ठेवले. संशयितांकडील मोबाईलही पोलिसांनी जप्त केले नाहीत.

त्याचाच फायदा उठवत अक्रम टॉयलेटमध्ये गेला आणि तेथून त्याने साक्षीदारांना धमकी दिली. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यावर ही गोष्ट उघड झाली. ही धमकी दिली, तेव्हा साहाय्यक उपनिरीक्षक पावसकर हे फातोर्डा पोलिस स्थानकात ड्युटी ऑफिसर होते, म्हणून त्यांना निलंबित केले, तर वरिष्ठांचे आदेश पाळले नाहीत म्हणून निरीक्षक नॅथन आल्मेदा यांची राखीव पोलिस विभागात बदली केली.

मशिदीजवळ चारच पोलिसांचा बंदोबस्त

घोगळ मशिदीसमोर शुक्रवारी खून झाला, त्यावेळी त्याठिकाणी पोलिस नियुक्त केले होते. मात्र, त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने ते मोठ्या जमावाला अडवून धरू शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मशीद आवारात वाद होऊ शकतो, याची आगावू माहिती फातोर्डा पोलिसांना दिली होती.

त्यामुळे त्या दिवशी मशीद आवारात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवणे आवश्यक असतानाही एक उपनिरीक्षक व तीन पोलिस असे फक्त चारच पोलिस तिथे नियुक्त केले होते. एकूणच हे प्रकरण हाताळताना पोलिसांनी जे गांभीर्य दाखवायला हवे होते ते दाखवले नाही, असा निष्कर्ष पुढे आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: 12 ऑगस्टपासून संपणार आर्थिक चिंता! पगारवाढ अन् प्रमोशनचा योग; गुरु ग्रहाचा उदय 'या' राशीला करणार मालामाल

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

SCROLL FOR NEXT