Lord Parshuram Jayanti Dainik Gomantak
गोवा

Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

Lord Parshuram Jayanti: पृथ्वीवरील संत आणि ऋषींच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात जन्म घेतला होता, असे मानले जाते.

Pramod Yadav

Lord Parshuram Jayanti

देशात आज (10 मे) रोजी परशुराम जयंती साजरी होत आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेसोबत वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला परशुराम जयंतीही साजरी केली जाते.

परशुराम जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भजन, कीर्तन, पठणाचे आयोजन केले जाते. गोमंत भूमीचे जनक प्रभू परशुरामाची जयंती गोव्यात उत्साहात साजरी केली जाते.

भगवान परशुराम कोण आहेत?

भार्गव वंशात जन्मलेले भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार मानले जातात. त्यांचा जन्म त्रेतायुगात झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला, अशी पौराणिक धारणा आहे.

परशुरामाचा जन्म झाला तेव्हा त्यांचे नाव राम होते, परंतु नंतर त्यांना भगवान शिवाकडून अनेक अद्वितीय शस्त्रे मिळाली. महादेवाने 'परशु' ज्याला फरशी किंवा कुऱ्हाड असेही म्हणतात, 'राम' ला भेट दिली होती.

कुऱ्हाड मिळाल्यानंतर त्याचे नाव परशुराम झाले, म्हणजेच कुऱ्हाड धारण करणारा राम. तेव्हापासून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले. असे मानले जाते की पृथ्वीवरील संत आणि ऋषींच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात जन्म घेतला होता.

गोव्याशी परशुरामांचा काय सबंध आहे?

परशुरामांनी सह्याद्रीवरुन समुद्रात बाण सोडला आणि गोव्यासह कोकणची निर्मिती केली अशी मान्यता आहे. परशुरामांना सप्त कोकणचा देव असेही मानले जाते. परशुराम गोव्यासह कोकण आणि दक्षिणेत केरळमध्ये देखील पूजनीय आहेत.

गोव्यात हरमल आणि काणकोणमध्ये परशुरामाची मंदिरे आहेत. यात काणकोणमधील पैंगीण एक परशुरामाचे पुरातन मंदिर आहे. तर, हरमलजवळील पांढऱ्या रंगाच्या पर्वताला परशुरामाचे यज्ञ करण्याचे ठिकाण मानले जाते.

परशुराम जयंती का साजरी केली जाते?

भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीयेला झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव राम ठेवण्यात आले.

काही काळानंतर जेव्हा महादेवाने परशु नावाचे शस्त्र रामाला दिले तेव्हा रामजींना परशुराम म्हटले जाऊ लागले. याचा अर्थ परशुराम जयंती परशुरामजींच्या जन्मानिमित्त साजरी केली जाते.

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 10 मे 2024 रोजी पहाटे 4:17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 मे 2024 रोजी पहाटे 2:50 वाजता समाप्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT