Goencho Raponkarancho Ekvott and Fishermens Association warns state administration  Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोंयचो रापोणकारांचो एकवोट आणि मच्छीमार संघटनेची प्रशासनाला चिथावणी

मुरगाव बंदर प्राधिकरणाला वेर्णा रेल्वेस्थानकात बेकायदेशीर कोळसा डंप यार्डला परवानगी दिल्याबद्दल संघटना आक्रमक

दैनिक गोमन्तक

वास्को: गोंयचो रापोणकारांचो एकवोट आणि इतर मच्छीमार संघटनेने राज्य प्रशासनासह मुरगाव बंदर प्राधिकरणाला वेर्णा रेल्वेस्थानकात बेकायदेशीर कोळसा डंप यार्डला परवानगी दिल्याबद्दल चिथावणी दिली.

वेर्णा रेल्वेस्थानक परिसरामध्ये ट्रकांतील कोळसा उतरविला जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात कोळसा साठविण्यात आल्याने स्थानिकांनी रेल्वेस्थानक परिसरात एकत्र येत त्याविरुद्ध आवाज उठविला. यानंतर अधिकाऱ्यांनी कोळसा तेथून हटविण्याची सूचना संबंधितांना केली आहे. याप्रकरणी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही कोणताही दाखला घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Goencho Raponkarancho Ekvott and Fishermens Association warns state administration)

रेल्वेस्थानक परिसरामध्ये ट्रकातील कोळसा उतरविण्यात येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक तेथे जमले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर तेथे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वेर्णा पोलिस स्थानकाचे (Verna Police Station) पोलिस अधिकारी पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता एका व्यक्तीने, आपणाकडे कोळसा जमा करून तो रेल्वेतून नेण्याची परवानगी असल्याचे सांगितले. त्याने परवानगी देण्यासंबंधीचे पत्र वेर्णा रेल्वेस्थानक अधिकाऱ्यांना दिले. ते पत्र बेलापूर येथील कोकण मुख्यालयाला पाठविण्यात आले. तेथून परवनागी मिळण्यापूर्वीच कोळसा उतरविण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे उघड झाले.

सदर कोळसा उघड्यावर उतरविण्यात आल्याने तेथे आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कोळसा उतरविण्याचे काम बंद करून उतरविण्यात आलेल्या कोळसा झाकून ठेवा, अशा सूचना अधिकाऱ्यांनी संबंधिताला केल्या. सुमारे वीस ट्रकांमधील कोळसा तेथे उतरविण्यात आला आहे. सदर कोळसा आमोणा येथून आणला जात आहे. तो रेल्वेने झारखंड येथे पाठविण्यात येणार असल्याचे नुवेचे माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले.

नागोवा वेर्णा पंचायतीच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष ज्युआंव परेरा यांनी यासंबंधी संताप व्यक्त केला. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी दिला.तसेच गोंयचो रापोणकारांचो एकवोट आणि इतर मच्छीमार संघटनेने राज्य प्रशासनासह मुरगाव बंदर प्राधिकरणाला वेर्णा रेल्वे स्थानकात बेकायदेशीर कोळसा डंप यार्डला परवानगी दिल्याबद्दल चेतावणी दिली.

गोंयचो रापोणकारांचो एकवोटचे (Goencho Raponkarancho Ekvott) ओलेन्सिओ सिमाॅईश म्हणाले की, 'राज्यभरातील कोणत्याही कोल यार्डला विरोध करण्यासाठी कानाकोपऱ्यातून आणि मोरजी येथील नेते येथे आले आहेत. गोव्याचे आणि गोव्यातील कोणत्याही कोळसा विस्तार योजना/यार्डांना परवानगी न देण्याची शपथ घेतली आणि जर ती तेथील लोकांवर लादली गेली तर आम्हाला एमपीए, वास्कोमधील सर्व कोळसा ऑपरेशन बंद करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा यावेळी सिमाॅईश यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT