Olencio Simos Dainik Gomantak
गोवा

Projects in Goa : गोव्यासाठी घातक असलेले सर्व प्रकल्प रद्द करा

गोंयच्या रापणकारांचो एकवोट संघटनेची सरकारकडे मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Projects in Goa : गोव्यासाठी घातक असलेले सर्व प्रकल्प रद्द करा, अशी मागणी गोंयच्या रापणकारांचो एकवोट आणि गोंयचो एकवोट या संघटनांनी सरकारकडे केली आहे. दिवंगत मातान्ही साल्ढाना यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या योगदानाचे आठवण करत दोन्ही संघटनांनी रेल्वे ट्रॅक दुपदरीकरण, पंचतारांकित रिसॉर्ट्स, मेगा हाउसिंग यासारख्या सर्व विध्वंसक प्रकल्प मागे घेण्याची मागणी केली आहे.

सोमवारी कासावली येथे एका कार्यक्रमात मातान्ही यांच्या पत्नी आणि माजी मंत्री एलिना साल्ढाणा, गोंयच्या रापणकारांचो एकवोट आणि गोंयचो एकवोट यांनी मातान्ही यांची जयंती साजरी केली. मातान्ही हे रेल्वेचे दुहेरी ट्रॅकिंग, 5 स्टार रिसॉर्ट्स, मेगा हाऊसिंग यासारख्या विनाशकारी मेगा प्रकल्पांच्या विरोधात होते. मात्र सरकारकडून या प्रकल्पांसाठी पोषक वातावरण तयार केलं जात आहे, असा आरोप गोंयच्या रापणकारांचो एकवोट संघटनेचे अध्यक्ष आग्नेलो रॉड्रिग्ज केला आहे.

राज्य आणि गोवावासीयांच्या हिताच्या विरोधात असलेले सर्व प्रकल्प मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केलं आहे. जर मातान्ही जिवंत असते तर हे प्रकल्प रद्द झाले आहेत, असंही रॉड्रिग्ज म्हणाले. गोंयच्या रापणकारांचो एकवोटचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोस यांनीही यावेळी सरकारच्या धोरणांवर भाष्य केलं. गोव्याने एक समर्पित योद्धा गमावला आहे. ज्याचे प्रेम केवळ गोवा आणि गोवावासीयांना वाचवण्यासाठी होते, असं म्हणत त्यांनी मातान्ही यांना आदरांजली दिली. पुढे बोलताना त्यांनी तरुणांना आवाहन केले की, दिवंगत मातान्ही साल्ढाणा यांचे अनुकरण करा जेणेकरून आमच्याकडे त्यांच्यासारखे महान नेते असतील. ज्यांनी निःस्वार्थपणे गोव्यासाठी काम केले आणि ज्याची सध्या गोवा राज्यात मोठी कमतरता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News: वास्कोत कचरा व्यवस्थापनाला बळ; दोन नवीन कॉम्पॅक्टरचे उद्घाटन, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचा इशारा

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

SCROLL FOR NEXT