Waking Grunt - Amit Naik Dainik Gomantak
गोवा

बोलता बोलता रॅप करणारा, गोमन्तकीयांचा लाडका 'वेकींग ग्रॅण्ट'; नेम, फेम, पैसा! अमित नाईकची दिलखुलास मुलाखत

Pramod Yadav

Social Media Influencer Waking Grunt Amit Naik Interview: बोलता बोलता अगदी सहज गप्पांमधून रॅप करत सगळ्यांना चकित करणारा वेकींग ग्रॅण्ट सध्या अनेकांचा आवडता झाला आहे. त्याच्या खास शैलीतून आणि विशेषतः कोकणी भाषेतून त्याने सादर केलेले रॅप गोव्यातील तरुणांमध्ये त्याची प्रसिद्धी वाढवत आहेत.

गोमन्तक माध्यम समूहातर्फे घेतलेल्या इन्फ्लुएन्सर्स मीट मध्ये अमितशी आम्ही खास संवाद साधला. बऱ्याच विषयांवर त्याने मोकळेपणाने आपली मते मांडली. 

सुरुवात कुठून आणि कशी झाली?

''वेकींग ग्रॅण्ट' नावाचा एक म्युझिक बँड होता. त्याच नावाने मी 2014 ते 15 च्या दरम्यान, इन्स्टाग्रामवर एक अकाउंट सुरु केले. आणि या अकाउंट वर समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर मी व्यक्त होऊ लागलो. लोकांना माझे रॅप आवडू लागले. आणि हळूहळू मला प्रतिसाद येऊ लागला.' 

'गेली अनेक वर्षे चर्चेत असणारा गोव्यातील आयआयटीचा प्रकल्प सर्वात आधी, वाळपई येथे नियोजित होता. यावेळी अनेकांनी याला विरोध केला मीही यावर 'कायद्याचा फायदा' नावाने मी रॅप केले होते.

या रॅपला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी आवर्जून ते शेअर केले. या माध्यमातून मी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलो. याशिवाय रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केलेले रॅप असेल किंवा बेरोजगारीवर केलेले रॅप असेल लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.' असे अमित सांगत होता. 

Waking Grunt - Amit Naik

कशाप्रकारचे व्हिडिओ करायला आवडतात?

अलीकडे सगळीकडे वापरले जाणारे कन्टेन्ट क्रिएटर हे नाव अमिताला रुचत नाही. 'मी केवळ सामाजिक मुद्यावर मला वाटणाऱ्या भावना रॅपच्या माध्यमातून मांडतो.' असे तो म्हणतो. 'गोव्यात दरदिवशी काहीतरी घडते आहे, या घटना पाहून मन व्यथित होते, खूप काही लिहावेसे, बोलावेसे वाटते पण याचा लोकांना किती प्रश्न पडतो यानेही मी हैराण होतो.

म्हणून मागच्या चार महिन्यात मी कोणतेही रॅप केलेले नाही. शांत राहतो आहे, स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. जेव्हा सगळेच सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेव्हा त्याचा मोठा उद्रेक होईल. आणि कदाचित त्यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखे काही नसेल.' अमित बोलत होता. 

काम करताना काय खटकतं?

'आजकाल लोकांमध्ये सामाजिक भान आणि व्यवहारज्ञान दोन्ही गोष्टींची कमतरता निर्माण होत चालली आहे. एखाद्या सामाजिक मुद्द्यावर व्यक्त झाल्यास किंवा त्यावर भाष्य केल्यास अनेक प्रकारे दबावाला सामोरे जावे लागते.

त्यातून पोलीस, कोर्ट- कचेरी अशा अनेक भानगडी मागे लागतात. यातूनच आपल्यामुळे आपल्या घरच्यांवरही संकट कोसळत असल्याची भावना दाट होत जाते. या सगळ्यात आपल्याकडील न्यायव्यवस्थेचे वास्तव भीषण आहे. म्हणून अलीकडे मी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणे कमी केले आहे.' 

राजकीय दबाव आला का?

सोशल मीडियावर काही करत असताना अनेक मार्गानी दबाव आणला जातो. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' असे जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्येक जण त्याचाच वापर करून या माध्यमात काम करणाऱ्यांची गळचेपी करत असतात, असेही त्याने सांगितले. बऱ्याचवेळा तुमच्या खांद्यावरुन बंदूक चालवली जाऊ शकते आणि तुम्ही त्याचे बळी ठरता असेही अमितने राजकीय संदर्भ देत नमूद केले.

राज्यात मजबूत विरोधक नाही ही खंतही त्याने बोलून दाखवली. राजकीय नेते मत मागण्यासाठी येतात आणि नंतर पाच वर्षे दिसत नाहीत. त्याबाबत कोणी प्रश्न विचारण्याचे धाडसही करत नाहीत, असे सांगत त्यांने येत्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचेही सांगितले.

पैसे किती मिळतात?

'सोशल मिडियावर दिसणाऱ्या लोकांचा खूप चकचकीतपणा दिसत असला तरी तुमच्या कन्टेन्टवरूनच तुम्हाला किती पैसे मिळतील हे ठरत असते. काहीतरी सकारात्मक करू पाहणाऱ्यांच्या हाती फारसा पैसा लागत नाही. मिळणाऱ्या पैशातून उदर्निर्वाहही धड करता येत नाही अशीही अवस्था कधी कधी होते.

मी मायनिंग इंजिनिअर आहे, पण माझ्या जगण्याच्या गरजा भागविण्यासाठी व्हिडिओ एडिटींग, शूट, ड्रायव्हिंगची कामे देखील करतो. त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतात.' सोशल मिडियातून पैसे मिळतात का? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला.

Waking Grunt - Amit Naik

तरुणांना काय सल्ला देशील?

'तरुणांनी सोशल मिडियाकडे वळताना एखादा उद्देश घेऊन त्यामध्ये यावे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी कष्ट करावेत. फक्त प्रसिद्धी आणि फेमसाठी याच्या मागे लागू नये. फॉलोवर्स वाढले की लगेच पैसे मिळतील हा भ्रम आहे. सोशल व्हा पण त्याच्या आहारी जाऊ नका.', असा सल्लाही त्याने ग्लॅमर म्हणून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना दिला.

'मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हते. अनेक लोकांनी, मित्रांनी मला मोठी मदत केली. गोवा आणि बाहेरच्या लोकांनी देखील मला मदत केली. तुमच्याकडे कला असेल तर समाजात खूप चांगले लोक आहेत ते तुमच्या मदतीसाठी समोर येतील.', असे सांगत त्याने या क्षेत्रात काम करताना आलेल्या सकारात्मक अनुभवांबद्दलही सांगितले. 'या सर्व प्रवासात कुटुंबियांची मोलाची साथ आणि मदत मिळाली असेही त्याने आवर्जून नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT