National Para Athletics Championship Dainik Gomantak
गोवा

National Para Athletics Championship: गोव्याच्या साक्षीला पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, ब्राँझपदक

बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या २२व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने लांबउडीत सुवर्णपदक, तर १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

किशोर पेटकर

National Para Athletics Championship: गोव्याची पॅरा अ‍ॅथलीट साक्षी काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेती कामगिरी पुन्हा एकदा प्रदर्शित केली. बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या २२व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने लांबउडीत सुवर्णपदक, तर १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

उसगाव येथील साक्षी राष्ट्रीय स्पर्धेत टी-२० (अंधत्व) प्रकारात सहभागी झाली होती. या विभागातील ती एकमेव गोमंतकीय पॅरा अ‍ॅथलीट होती.

साक्षीने डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॅरा गेम्समध्येही दोन पदके जिंकली होती. या स्पर्धेत पदके जिंकणारी ती पहिली गोमंतकीय पॅरा अ‍ॅथलीट ठरली होती. खेलो इंडिया राष्ट्रीय पॅरा गेम्समध्ये साक्षीने १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक, तर लांबउडीत रौप्यपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: "पर्वरी उड्डाणपुलाचे काम वाहतूक न थांबवता पूर्ण करा", मंत्री खंवटे यांचे कंत्राटदारांना निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; रवींनी 'तो' निर्णय का घेतला?

Salcete: नवीन कचरावाहू कॉम्पॅक्टर निकामी, मडगाव पालिकेने मागविलेल्या वाहनात तीनच दिवसांत बिघाड

Goa Live News: गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर

FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

SCROLL FOR NEXT