Goa's Oldest Women Matilda D'souza Died Dainik Gomantak
गोवा

Goa's Oldest Women Died: पहिल्या विश्व महायुद्धापूर्वी जन्मलेल्या गोव्यातील सर्वात वृद्ध महिला 'मॅटी' यांचे निधन

काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते

Pramod Yadav

Goa's Oldest Women Died: पहिल्या विश्व महायुद्धाच्या तीन वर्षापूर्वी जन्म झालेल्या गोव्यातील सर्वात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. माटीलडा डिसुझा (मॅटी) (Matilda D'souza, Matty) रविवारी सायंकाळी वयाच्या 111 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर गोमेकॉ आणि त्यानंतर म्हापसा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

माटीलडा डिसुझा यांचा 25 ऑक्टोबर 1911 रोजी रोजी जन्म झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते. माटीलडा यांच्या पश्चात्य दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

माटीलटा यांच्यावर मंगळवारी (दि.19) सेंट अलेक्स चर्च, कळंगुट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अलिकडेच गोवा पोलिसांच्या वतीने वृद्धांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उत्तर गोव्यातील पोलिसांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो, पंचायत सरपंच जोसेफ सिक्वेरा आणि पंचायत सदस्य यांनी मागील वर्षी वाढदिवसाला त्यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT