Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Blue Cab: पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी आता ब्ल्यू कॅब; वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांची घोषणा

ब्ल्यु कॅब अ‍ॅपचे उद्या अनावरण करणार

Akshay Nirmale

Goa Blue Cab: मोपा विमानतळावर विमानांची ये-जा गुरूवारी 5 जानेवारीपासून सुरू होत आहे. या सुरू होत असलेल्या व्यावसायिक ऑपरेशनच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वाहतूक अधीक्षक यांची बैठक झाली. यात त्यांनी विविध सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

विमानतळावरून प्रवाशी वाहतुकीसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सरकारने ‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’ सुरू केले आहे. मात्र, अद्यापही ते कार्यान्वित झालेले नाही. दुसरीकडे पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने ही मागणीही मान्य केली आहे. या टॅक्सींसाठी ‘ब्ल्यू कॅब अ‍ॅप’ सुरू करण्यात आले असून उद्या, गुरूवारी 5 जानेवारी रोजी ते सुरू करण्यात येईल. पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनी त्यावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, वाहतुक मंत्रालयातर्फे पेडणेतील टॅक्सी चालकांसाठी ब्ल्यू कॅब सुरू करण्यात येईल. त्यामुळे यापुढे मोपा विमातळावर पेडणेतील स्थानिक टॅक्सी चालकांसाठी आता काळी-पिवळी टॅक्सी नसेल. याबाबतची नोटीस उद्या, ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. गोवा टॅक्सी अ‍ॅपवर आत्तापर्यंत ११०० टॅक्सी मालकांनी नोंदणी केली आहे. छाणणीनंतर १०० हून अधिक टॅक्सी रोडवर धावण्यास सज्ज आहेत. विमानतळावरील कायदा आणि सुव्यवस्था बाधित होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT