First Gym For Women in Goa Dainik Gomantak
गोवा

First Gym For Women in Goa: 'या' गावात सुरू झाली महिलांसाठीची गोव्यातील पहिली व्यायामशाळा

मंत्री गोविंद गावडे, रोहन खंवटे यांनी केले उद्घाटन

Akshay Nirmale

Goa's First Gym For Women: गोव्यातील महिलांसाठीच्या पहिल्या व्यायामशाळेचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. सुकुर पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्यांनी सुकुर पंचायतीमध्ये या व्यायामशाळेची सुरवात केली आहे.

यावेळी क्रीडा मंत्री गोविंद गावडे, पर्यटन मंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, सुकुरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, उपसरपंच माया केणी, यांच्या पंचायतीचे सदस्य गौरी वळवईकर, राऊळू पार्सेकर, राजाराम शेटगावकर, दीपिका पेडणेकर, सर्वेश हळर्णकर, अॅशले लोबो, साची मांजेरकर आदी उपस्थित होते.

पुरूषांसाठी म्हणून व्यायामशाळा अनेक ठिकाणी सुरू होत असतात. किंबहुणा व्यायामशाळा ही पुरूषांना केंद्रस्थानी ठेऊनच उभारली जात असते. पण आजकाल महिलाही विविध व्यायाम प्रकारांच्या मदतीने फिट राहण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यामुळे महिलांसाठीही व्यायामशाळा असावी, असा विचार सुकूरमध्ये पुढे आला होता. येथील लोकप्रतिनिधींनी त्याला पाठबळ देत पाठपुरावा करून अखेर महिलांसाठी व्यायामशाळा उभारली आहे.

सरपंच, उपसरपंच महिला असल्याने तसेच पंचायत सदस्यांमधील इतर महिला सदस्यांनी यात पुढाकार घेतला होता. त्याला सर्वस सदस्यांनी पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Bank Theft: वास्कोत बँक लुटण्‍याचा डाव उधळला! पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला प्रयत्न; बेळगावच्या व्यक्तीला अटक Video

Goa IIT: गोवा आयआयटीसाठी 3 जागा निश्चित! संजीवनी, केरी, उसगावातील जागांचा पर्याय

Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

Coal Jetty Protest: कुडचडे कोळसा जेटीविरोधात एल्गार! असोल्डा, शेळवण, होडारवासीय आक्रमक; रद्द करण्‍यासाठी 8 दिवसांची मुदत

Chimbel: महिलांच्या एकजुटीसमोर चिंबल पंचायत नरमली! ग्रामसभा न घेतल्याने संताप; निदर्शनांनंतर तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT