Goas COVID-19 task force will hold meeting on todya to discuss guidelines for Christmas and New Year celebrations

 

Dainik Gomantak

गोवा

Omicron Alert: गोवा मुख्यमंत्र्यांचे पर्यटन उद्योगाला कोविड त्रिसुत्री पाळण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी पर्यटन व्यावसायिकांना सणासुदीच्या काळात कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

देशातील कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता, गोव्याची कोविड-19 (Covid-19) टास्क फोर्सची (Goa Task Force) शुक्रवारी ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना त्यांनी पर्यटन उद्योगाला विशेषत: सणासुदीच्या काळात सर्व कोरोनाव्हायरसशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले.

राज्यात हा विषाणू पसरू नये यासाठी पर्यटन उद्योगातील संबंधितांनी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी गोवा सरकार (Goa Government) सज्ज झाले आहे. “आतापर्यंत गोव्यात ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसले तरी, सणासुदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करणे आणि राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे. काही राज्यांनी रात्रीचा कर्फ्यू (Night curfew) लागू केला आहे. परंतु आपल्याला असे उपाय करावे लागणार नाहीत यासाठी आपण कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे सावंत म्हणाले.

गोवा पर्यटन (Goa Tourism) उद्योगाने कोविड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्स, मास्क लावणे आणि सॅनिटायझेशन यांसारख्या COVID-19 त्रिसुत्री नियमांचे पालन केले पाहिजे. गोवा राज्य विमानतळावर येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची RT-PCR टेस्ट घेण्यात येत आहे ज्यांच्या रिपोर्ट सकारात्मक आला त्यांना विलगिकरणात ठेवण्यात येत आहे. दोबोळी विमानतळावर येणाऱ्या इतर सर्व प्रवाशांवरही लक्ष ठेवले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT