Corona is rampant in Maharashtra Dainik Gomantak
गोवा

राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीच्या 7 पट

गोव्यात लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

राज्यातील कोरोनाचा आलेख नागरिकांना विचार करायला लावणारा आहे. कारण शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजीचा कोरोना रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा सात पट जास्त नोंदवला गेला आहे. गोव्याचा दर 14. 7% आहे. तर हाच दर राष्ट्रीय आकड्याच्या सात पटीने वाढला आहे. त्यामूळे नागरिकांनी सण उत्सव सुरु असले तरी याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते.

(Goa's Covid-19 positivity rate 7 times national average)

शुक्रवारी कोरोना चाचणी केलेल्या 515 नमुन्यांपैकी 76 नमुने सकारात्मक आले आहेत. मिळालेल्या माहितीसनुसार गोव्यासाठी 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यानचा साप्ताहिक सकारात्मकता दर दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात जास्त होता.

2 सप्टेबर रोजी एका दिवशी राज्यात तीन रुग्ण हॉस्पिटलायझ झाले आहेत. तर उर्वरित 73 लोकांनी होम आयसोलेशनची निवड केली. त्यामूळे पॉझिटिव्हिट होणारे रुग्ण उपचार सुरु करत असले तरी रुग्ण वाढूच नयेत यासाठी नागरिकांनी आता विचार करणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 23 ऑगस्टपासून पॉझिटिव्हिटी रुग्ण कमी होत असताना, त्यांची संख्या 1,091 वर पोहोचली आहे. तेव्हा चाचणी केलेले नमुने देखील कमी होत आहेत.काल शुक्रवारी एकाच दिवशी गोव्यात कोरोनाची 588 सक्रिय प्रकरणे आढळून आली. दोन लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आणि 127 जण या आजारातून बरे झाले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.2% आहे.

गोव्यात लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी

सर्वात कमी लसीकरण झालेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश 8% सह मेघालय आणि 9% सह झारखंड आणि नागालँड आहेत. तुलनेत आंध्र प्रदेशने त्यांच्या लोकसंख्येच्या 35%, छत्तीसगडने 35% आणि गुजरात, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमने त्यांच्या लोकसंख्येच्या 33% लोकांना डोस दिला आहे.तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये, अंदमान आणि निकोबार बेटांनी 82%, लडाख 60% आणि पुद्दुचेरी 44% समाविष्ट केले आहेत.

एका राष्ट्रीय प्रसारमाध्याने अलीकडेच नोंदवले आहे. याचे कारण म्हणजे नागरिकांमध्ये असलेली साइड इफेक्ट्सची भीती हे एक प्रमुख आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने केलेल्या आंतरविभागीय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बूस्टर डोस घेण्याच्या संकोचासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत, सर्वात सामान्य कारण म्हणजे लसीच्या दीर्घ आणि अल्पकालीन दुष्परिणामांची भीती. त्यामूळे सध्या याचा विचार करता नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT