Churchill Alemao And NCP praful patel visit 
गोवा

ममतांची साथ सोडलेले गोव्याचे माजी CM चर्चिल NCP च्या वाटेवर? पक्षप्रवेश, लोकसभेबाबत काय म्हणाले आलेमाव?

चर्चिल आलेमाव आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार का? या आशयाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Pramod Yadav

Churchill Alemao: गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आलेमाव यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आलेमाव यांनी नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली.

त्यामुळे चर्चिल आलेमाव आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार का? या आशयाच्या चर्चांना उधाण आले आहे.

तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आलेमाव यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. आलेमाव यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा निराधार असल्याचे सांगितले. तसेच, प्रफुल्ल पटेल माझे चांगले मित्र असून, यापूर्वी देखील भेटत होतो. प्रत्येक भेट राजकीय नसते. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मी अद्याप विचार केला नाही. असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.

प्रफुल्ल पटेल आणि मी अनेक फुलबॉल मॅच भरवण्यासाठी एकत्र काम केले आहे. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबध आहेत. असेही आलेमाव यांनी सांगितले.

आलेमाव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांच्या उमेदवारीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अद्याप असा विचार नाही मात्र, मतदार मला सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आलेमाव यांनी गोवा फुटबॉल असोशिएशनचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीचे नते क्लाईड क्रास्टो यांनी आलेमाव यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या आहेत. त्याच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोव्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते शरद पवारांसोबत असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आलेमाव यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास ते शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT