Santosh Trophy  Dainik Gomantak
गोवा

Santosh Trophy : सलग पाच पराभव पत्करत गोव्याची 'संतोष करंडक' मधील मोहीम संपली

संतोष करंडक फुटबॉलमध्ये महाराष्ट्राकडून हार

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ, पण या खेळातील मैदानावर गोव्याची पीछेहाट कायम आहे. संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत रविवारी पराभवासह गोव्याची मोहीम संपली. पाच वेळच्या माजी विजेत्यांचा स्पर्धेतील हा सलग पाचवा पराभव ठरला.

ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेच्या अ गटात महाराष्ट्राने गोव्यावर 2-0 असा सफाईदार विजय नोंदविला. दोन्ही गोल हिमांशू पाटील याने नोंदविले. त्याने अनुक्रमे पाचव्या व 89 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे महाराष्ट्राने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

त्यांना तीन गुण मिळाले, त्यामुळे गटसाखळीत त्यांचे सहा गुण झाले. गोव्याला शून्य गुणांसह मोहीम आटोपती घ्यावी लागली. स्पर्धेत त्यांनी तब्बल 14 गोल स्वीकारले, तर फक्त चार गोल नोंदविले. संतोष करंडक स्पर्धेच्या इतिहासात गोव्याची ही निकृष्ट दर्जाची कामगिरी ठरली.

पंजाब, कर्नाटकला रियाधचे तिकीट

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी सौदी अरेबियातील रियाध येथे खेळली जाईल. त्यासाठी अ गटातून पंजाब व कर्नाटकने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवून पात्रता मिळविली.

रविवारी अ गटातील अन्य लढतीत पंजाबने गतविजेत्या केरळला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. या निकालामुळे केरळचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. पंजाबचे गटात सर्वाधिक 11 गुण झाले, तर केरळला आठ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहावे लागले.

आणखी एका सामन्यात कर्नाटकने ओडिशाला 2-2 असे गोलबरोबरीत रोखून गुण विभागून घेतला. कर्नाटकने त्यामुळे नऊ गुण झाले व त्यांना गटात दुसरा क्रमांक मिळाला. ओडिशाला पाच गुणांसह पाचव्या स्थानी राहावे लागले.

गोव्याची अपयशी मालिका कायम

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत गोव्याने पाच वेळा विजेतेपद, तर आठ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. 2018-19 मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पंजाबकडून हार पत्करावी लागल्यामुळे गोव्याला अंतिम फेरीचे द्वार बंद झाले होते.

2016-17 मध्ये गोव्याने शेवटच्या वेळेस अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा घरच्या मैदानावर बंगालकडून हार पत्कारावी लागल्यामुळे गोव्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2008-09 मध्ये गोव्याने बंगालला हरवून शेवटच्या वेळेस प्रतिष्ठेचा संतोष करंडक पटकावला होता.

गतमोसमात (2021-22) गोव्याचे आव्हान पश्चिम विभागातच आटोपले होते, त्यामुळे त्यांना मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवता आली नव्हती. आता पुन्हा एकदा या स्पर्धेत गोव्याला अपयश आले.

अ गट गुणतक्ता

संघ- सामने- विजय -बरोबरी- पराभव- गुण

पंजाब 5 3 2 - 11

कर्नाटक 5 2 3 0 9

केरळ 5 2 2 1 8

महाराष्‍ट्र 5 1 3 1 6

ओडिशा 5 1 2 2 5

गोवा 5 0 0 5 0

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: दारू पिऊन गाडी चालवणे जीवावर बेतले

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

Jasmine Flower: 'जायांचे मळे वाचवायचेच'! ग्रामसभेत ठराव मंजूर; व्यावसायिक, निवासी प्रकल्पांना विरोध

Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT