Goa Carnival 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2024: गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; कुठे, कधी असणार फ्लोट? जाणून घ्या

09 फेब्रुवारी रोजी पर्वरीत फ्लोट परेड असेल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री रोहने खंवटे यांनी दिली.

Pramod Yadav

Goa Carnival 2024: गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, यंदा 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कार्निव्हलची धूम पाहायला मिळणार आहे. 09 फेब्रुवारी रोजी पर्वरीत फ्लोट परेड असेल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री रोहने खंवटे यांनी दिली.

कार्निव्हलची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी पणजी येथून होईल, 11 फेब्रुवारीला मडगाव, वास्कोत 12 फेब्रुवारीला आणि 13 फेब्रुवारी रोजी म्हापसात कार्निव्हलचे फ्लोट मार्च करतील अशी माहिती खंवटे यांनी दिली.

यासह शिगमोत्सवाच्या देखील तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 26 मार्च ते 08 एप्रिल या काळात शिगमोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम डिचोलीत होणार असून, प्रत्येक पालिकेला पाच लाखांचा निधी देण्यात आल्याची माहिती खंवटे यांनी दिली.

गोव्यात दरवर्षी होणाऱ्या कार्निव्हल आणि शिगमोत्सवाचे देश विदेशातील पर्यटकांना आकर्षण असते. गोव्याची संस्कृतीचे आनोखे दर्शन घडविणारे हे दोन उत्सव पर्यटकांसह स्थानिकांसाठी मोठी पर्वणी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT