Ban on sea Bathing  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: लाटा पाहण्यावरच पर्यटकांचे समाधान; समुद्र खवळल्याने सासष्टीतील किनारे ओस

वादळाच्या भीतीने तसेच मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथील किनारे ओस पडले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda : अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्या असल्याने राज्य सरकारने समुद्र स्नानासाठी राज्यात बंदी घातली आहे. त्यामुळे सासष्टीतील किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावरून उसळत असलेल्या लाटा पाहण्यावर समाधान मानावे लागत आहे.

या वादळाच्या भीतीने तसेच मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथील किनारे ओस पडले आहेत.

मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे साष्टीतील बाणावली, कोलवा, केळशी, मोबोर, बेतालभाटी येथील संपूर्ण किनारा लाटांनी व्यापला होता.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा तडाखा गोव्यातील किनारपट्टीसह कोकण राज्यातील किनाऱ्यांना बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.

त्यामुळे सरकारने समुद्रात मासेमारी करण्यासाठी, जलक्रीडा तसेच समुद्र स्नानावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ घटली आहे. किनाऱ्यावर धोक्याचे बावटे लावले आहेत.

सूचना धुडकावून पर्यटकांची मनमानी

गुजरातच्या दिशेने गेलेल्या चक्रीवादळाचा गोव्याला धोका नसला तरी समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीत प्रतितास 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत असल्याने उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्थनिकांनी तसेच पर्यटकांनी किनाऱ्यांवर जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे. तरीही काही हौशी पर्यटक किनाऱ्यावर दिसत आहेत. समुद्र स्नानासाठी मज्जाव असला तरीही काही जण जीवन रक्षकांची नजर चुकवून समुद्र स्नानासाठी समुद्रात उतरताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT