Mango Season: सर्वांचे आवडते फळ आणि फळांचा राजा असलेला आंब्याचा सीझन आता सुरू झाला आहे. यावर्षातील पहिला आंबा बाजारात दाखल झाला असून याबद्दल सर्वांनाच कुतूहल निर्माण झाले आहे. पणजी बाजारपेठेत गोव्यातील आंब्यांनी आपली जागा निर्माण केली आहे. मात्र आंब्याच्या दरामुळे गोवेकर नाराज झाले आहेत. (Goans upset over mango price)
सध्या एक डझन आंब्याची किंमत पणजी मार्केटमध्ये 2000 ते 4000 पर्यंत सुरू आहे. त्यामुळे नेमके आंबे विकत कसे घ्यायचे? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. आधीच भाजीपाल्यांचे दर (Vegetable Price in Goa) गगनाला भिडत असताना त्यात वर्षातून एकदा येणारा आंबासुद्धा सामान्यांच्या हाती लागत नाही. तर दुसरीकडे आंब्याचे दर जास्त असूनही अनेकांनी खरेदी करण्यास पसंती दिली आहे. मात्र सर्वांनाच एवढे महागडे आंबे विकत घेणे शक्य होत नसल्याने अनेकांनी या किमतींबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.