Mushroom Dainik Gomantak
गोवा

Mushroom: अळंब्यांतही घातक रसायने, पारख गरजेची; मागणी जास्त असल्यामुळे अनुचित प्रकारांना ऊत

पावसाळ्यात अळंब्यांचा आस्वाद घेणे ही गोवेकरांसाठी एकप्रकारची आतुरतेची बाब असते. मात्र, हीच अळंबी ओळखण्यात आपण फोल ठरल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर कशाप्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतो.

Sameer Amunekar

साखळी: पावसाळ्यात अळंब्यांचा आस्वाद घेणे ही गोवेकरांसाठी एकप्रकारची आतुरतेची बाब असते. मात्र, हीच अळंबी ओळखण्यात आपण फोल ठरल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर कशाप्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण सध्या मये-डिचोलीत घडलेल्या अळंबीतून विषबाधा प्रकरणातून पाहायला मिळत आहे.

एकाच कुटुंबातील सातजणांना अळंब्यांतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बाजारात सर्रासपणे मिळणारी अळंबी खायची की नाहीत, असा प्रश्न सध्या लोकांसमोर उभा राहिला आहे. याबाबत ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रा. राजेंद्र केरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अळंब्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

पावसाळ्यात वारुळावर येणाऱ्या अळंब्यांचे सेवन आज गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणात करू लागल्याने तसेच या रानटी अळंब्यांना मोठी मागणी असल्याने या अळंबी विक्रेत्यांमध्येही अळंबी विक्रीची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

या स्पर्धेत अळंब्यांनाही अव्वाच्या सव्वा दर लावले जात आहेत. गोव्यात वारुळावर येणारी टरटोकोमायसीस अळंबी लोक खातात. त्याचबरोबर शीत अळंबी, गो-अळंबी, शृंगार अळंबी गोव्यात मिळतात.

पूर्वी लोक रानात जाऊन अळंबी आणत होते. त्यांना त्या अळंब्यांचे ज्ञान होते. त्यातून मिळणारी प्रथिने, व्हिटामीन माहीत होते. रानात राहणारे आदिवासी, जंगलवासी लोक मर्यादित प्रमाणात अळंबी काढून आणत व खात होते.

परंतु आज हे अळंबी ओळखण्याचे तंत्र लुप्त झाल्याने अळंबी काढणाऱ्या लोकांच्या अजाणतेपणामुळे कधीकधी विषारी अळंबी लोकांच्या ताटात सहज वाढली जातात व ती पोटात गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, असे प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

प्राथमिक स्तरावर पटू शकते ओळख...

कलोरोफायलम मोली ब्डायटस ही अमानिटा प्रजातीतील विषारी अळंबी टरटोकोमायसीस अळंब्यांप्रमाणे दिसतात. त्यांचा रंग, आकार सारखाच असतो; पण ही अळंबी कापताना विशिष्ट प्रकारचा वास येतो. ती कापताना जर त्यांचा रंग बदलत असेल, विशेषतः निळसर रंग येत असेल, अळंब्यांना आयोडीनसारखा वास येत असेल तर ही अळंबी प्राथमिक स्तरावर विषारी म्हणून त्यांची ओळख पटू शकते. अशी अळंबी ओळखण्यासाठी तसे प्राथमिक तंत्र नाही; पण जंगलात वास्तव्य करणाऱ्या लोकांकडून याची ओळख पटू शकते. आज हे तंत्र समाजातून झपाट्याने नष्ट झाले असल्याने ही समस्या समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT