Goan Youth Lost In Telangana Dainik Gomantak
गोवा

Goan Youth Lost In Telangana: फातर्प्यातील युवक तेलंगणातून बेपत्ता; परराज्यातील पोलिसांनी दिला तपास करण्यास नकार

Goan Youth Lost In Telangana: बेपत्ता झालेल्‍या युवकाचे नाव सावियो फर्नांडिस असे असून त्‍याची आई दोमासिना हिने तक्रार नोंदविली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goan Youth Lost In Telangana

पिकअप ट्रकवरील मदतनीस युवक तेलंगणा राज्यातून बेपत्ता झाल्याने फातर्पा येथील त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी त्यांनी कुंकळ्ळी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवून सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

बेपत्ता झालेल्‍या युवकाचे नाव सावियो फर्नांडिस असे असून त्‍याची आई दोमासिना हिने तक्रार नोंदविली आहे.

फर्नांडिस कुटुंबीयांनी आरोप केला की, तेलंगणातील पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आई दाेमासिना यांनी मुलगा सावियो हा तेलंगणामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात नोंदविली.

फिर्यादीनुसार, सावियो केपेमधील एका व्यावसायिक आस्थापनासाठी पिकअप ट्रकवर मदतनीस म्हणून काम करत होता. २७ मार्च रोजी सावियो गोव्याहून साहित्य घेऊन निघालेल्‍या पिकअपमधून त्याच्या सहकाऱ्यांसह तेलंगणाला गेला.

२८ मार्च रोजी फर्नांडिस कुटुंबीयांना सावियो सुरक्षितपणे तेलंगणात पोचल्याचा एका व्यक्तीचा फोन आला.

मात्र, ३० मार्च रोजी अन्य एका मदतनीसाने फोन करून सांगितले की, सावियो करीमनगर-तेलंगणा येथून बेपत्ता झाला असून प्रयत्न करूनही तो सापडला नाही. त्यामुळे फर्नांडिस कुटुंबीय हवालदिल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT