Goan Youth killed in America Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय युवकाची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या

स्टोअर मध्ये काम करताना हत्या; चोरीचा प्रयत्न असल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

मडगाव : ह्यूस्टन या अमेरिकेतील टेक्सास प्रांतामध्ये गोमंतकीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एका स्टोअरमध्ये क्लर्क म्हणून काम करणाऱ्या जॉन डायस या 27 वर्षीय चांदर येथील युवकाला गोळ्या घालण्यात आल्या. हा सर्व प्रकार काल रविवारी झाला असून आज सोमवारी सकाळी जॉनच्या मृत्यूची बातमी त्याच्या चांदर या त्याच्या मूळ गावात पोहोचली.

जॉन हा एक चांगला फुटबॉलपटू होता. दक्षिण गोव्यातील चांदर आणि गिरदोली येथील क्लबसाठी तो पूर्वी गोलकिपिंग करायचा. मात्र रोजगाराच्या पोटी तो तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत (America) गेला होता. तिथेच त्याच्यावर हा आघात झाला. जॉनच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चांदर गावावर शोककळा पसरली.

स्टोअरमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या एका बुरखाधारी व्यक्तीने जॉनवर गोळी (Attack) झाडली. गोळीबाराच्या घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. पोलिसांकडून (Police) हल्लेखोराचा तपास सुरू करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT