Goa Recruitment DG
गोवा

Goa News: नोकरभरतीसाठी तरुणांची फरपट; एकमेव केंद्र पणजीत, तालुका स्तरावर अर्ज ठेवण्याची मागणी

Goa Government Job Application Process: सरकारने नोकरभरतीसाठी अर्ज नेऊन परत भरून देण्यासाठी पणजी हे एकमेव ठिकाण निवडले आहे. त्यामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पणजीत येऊन अर्जांसाठी प्रसंगी उपाशी पोटी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने युवकांमध्ये नाराजी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Centralized Application Process in Panaji Sparks Outrage Among Goan Job Seekers

सांगे: सरकारने नोकरभरतीसाठी अर्ज नेऊन परत भरून देण्यासाठी पणजी हे एकमेव ठिकाण निवडले आहे. त्यामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पणजीत येऊन अर्जांसाठी प्रसंगी उपाशी पोटी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने युवकांमध्ये नाराजी आहे.

पणजीत हेलपाटे मारून नोकरी मिळणार तरी काय, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. सरकारने किमान प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीसंदर्भात अर्ज उपलब्ध केल्यास जवळपासच्या लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

मानव विकास संशोधन मंडळ मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणार असल्याच्या जाहिराती देत आहे. तरी त्याचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना पणजीपर्यंत पाठविण्यास तयार नसतात. अर्ज मिळाला म्हणून काम होणारच याची खात्री नसते. वशिला नसल्यास काम होणे शक्य नसल्याचे अनेकजण ठामपणे सांगतात.

पोलिस भरतीवेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पाहता सहजपणे नोकरी मिळणे कठीण असल्याचा अनुभव अनेक जणांच्या गाठीशी आहे. म्हणून सामान्य पदावर काम करण्यासाठी शासन जर अर्ज मागवत असल्यास एकाच वेळी राज्यभरातील सर्व पोलिस स्थानक, मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT