NEET UG  Dainik Gomantak
गोवा

Goa Education News: वैद्यकीय शिक्षणाकडे गोव्याच्या विद्यार्थ्यांचा कल कमी?; NEET-UG साठी सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातून

5 हजाराहून कमी अर्ज असलेल्या सहा राज्यांमध्ये गोव्याचा समावेश

Akshay Nirmale

Goa Education News: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या माहितीनुसार, राज्य मंडळांमधून गेल्या पाच वर्षांत वैद्यकीय परीक्षेसाठी NEET-UG साठी सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातून आले आहेत. अर्जदारांच्या बाबतीत कर्नाटक राज्य मंडळ दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.

दरम्यान, 5,000 पेक्षा कमी NEET-UG अर्जदार असलेली राज्य मंडळे आहेत- नागालँड (2,422), गोवा (3,834) आणि उत्तराखंड (4,423).

यावर्षी 20.38 लाखांहून अधिक उमेदवार NEET साठी बसले होते. 2019 मध्ये ही संख्या 14.10 लाख होती. 2019-2023 मधील देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSE) होते.

या वर्षी, 5.51 लाखांहून अधिक अर्जदार राष्ट्रीय स्तरावर 12 वीच्या परीक्षा आयोजित करणाऱ्या बोर्डाचे होते. तथापि, राज्य मंडळांमध्ये, NEET-UG किंवा राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेसाठी (अंडर-ग्रॅज्युएट) अर्जांच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

यावर्षी, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 2.57 लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले. तर गतवर्षी 2.31 लाखांहून अधिक उमेदवारांनी NEET-UG साठी अर्ज केले होते.

कर्नाटक राज्य मंडळाकडून, यावर्षी NEET-UG साठी 1.22 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते, तर गेल्या वर्षी ही संख्या 1.14 लाख होती. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य मंडळ होते आणि यावर्षी 1.13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय चाचणीसाठी अर्ज केला होता.

उत्तर प्रदेश राज्य मंडळाकडून 1.11 लाखाहून अधिक उमेदवारांनी NEET-UG साठी अर्ज केले. केरळ राज्य मंडळातील अर्जदारांची संख्या 1.07 लाखांपेक्षा जास्त होती आणि बिहार राज्य मंडळाकडून ती 71,000 पेक्षा जास्त होती.

कमी अर्जदार असलेली राज्ये

सर्वात कमी अर्जदार त्रिपुरा राज्य मंडळ (1,683), मिझोराम राज्य मंडळ (1,844) आणि मेघालय राज्य मंडळ (2,300) मधील होते. 5,000 पेक्षा कमी NEET-UG अर्जदार असलेली इतर राज्य मंडळे आहेत – नागालँड (2,422), गोवा (3,834) आणि उत्तराखंड (4,423). गेल्या पाच वर्षांत हा ट्रेंड तसाच राहिला आहे, असे दिसून आले आहे.

NEET-UG ही बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS), बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) आणि बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन आणि सर्जरी (BAMS), बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी (बीएसएमएस), बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (बीयूएमएस) आणि बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस) आणि बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम यासाठी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा आहे.

एमबीबीएसच्या 80,000 वर जागा

देशातील 540 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 80,000 हून अधिक जागा आहेत. NTA मे 2019 पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने NEET-UG आयोजित करत आहे. यापूर्वी, NEET-UG CBSE द्वारे आयोजित घेतली जात होती.

यावर्षी 20.38 लाख उमेदवारांपैकी 11.45 लाख परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 48% जास्त आहेत. NTA नुसार, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक (1.39 लाख) पात्र उमेदवार होते, त्यानंतर महाराष्ट्र (1.31 लाख) आणि राजस्थान (एक लाखाहून अधिक) होते.

परदेशातही परीक्षा केंद्रे

NTA ने 7 मे रोजी भारतातील आणि परदेशातील 499 शहरांमधील 4,097 केंद्रांवर ही चाचणी घेतली होती. भारताबाहेरील 14 शहरांमध्ये - अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, दुबई आणि कुवेत सिटी येथेही ही परीक्षा झाली होती.

13 भाषांमध्ये ही परीक्षा

आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

PM Viksit Bharat Rojgar Yojana: काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? तरुणांना कसे मिळणार 15,000 रुपये? PM मोदींची घोषणा

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

SCROLL FOR NEXT