Russia-Ukraine War Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये हॉस्टेलखालील बंकरमध्ये आश्रय

अन्नाच्या कमतरतेमुळे चिंता वाढली, लवकरात लवकर सुटका करण्याची कुटुंबाची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अर्थातच भारतीय नागरिकही युक्रेनमध्ये ठिकठिकाणी फसल्याने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सरकारकडून चालले आहेत. गोव्यातील काही विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकले आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या चिंतेने कुटुंबीयांना मात्र ग्रासल्याचं चित्र आहे. (Russia-Ukraine War Latest News Updates)

दक्षिण गोव्यातील (South Goa) बाणावलीत राहणाऱ्या परेरा कुटुंबातील जेडन सध्या युक्रेनमध्ये अडकला आहे. आपला मुलगा सुखरुप परत यावा यासाठी परेरा कुटुंबीयांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 19 वर्षीय जेडन युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेला असून अन्नाची कमतरता भासत असल्याने त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

जेडन रशियन सीमेपासून 60 किमी अंतरावर असलेल्या समी या शहरात राहतो. भारतीयांना युक्रेनमधून (Ukraine) बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यासाठी भारतीयांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेन-रोमानिया सीमेवर पोहोचण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. ज्याठिकाणहून भारतीयांना परत मायदेशी आणलं जात आहे. मात्र जेडन ज्या शहरात राहतोय, त्या शहरातून या सीमेवर पोहोचण्यासाठी जवळपास 16 तासांचा प्रवास करावा लागतो, ज्याचा रस्ताही युक्रेनची राजधानी कीवमधून जातो. त्यामुळे परेरा कुटुंबीय आणखीच चिंतेत आहेत.

भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पश्चिमी सीमेवर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत रस्त्यांवरुन फिरणंही जिथे कठीण आहे, अशा परिस्थितीत सीमा कशी गाठायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. ठिकठिकाणी रशियाकडून हल्ले होत असल्याने रस्तेमार्गाने प्रवेश करणं खूप कठीण आहे. तसंच ट्रेन स्टेशन्सही तुफान भरलेली असल्याने अडचणी वाढल्याचं जेडनची आई अनिता यांचं म्हणणं आहे. यामुळे जेडन आपल्या सोबतच्या केरळ, तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांसोबत हॉस्टेलखालील बंकरमध्ये लपून बसला असून सुटकेसाठी प्रार्थना करत असल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

विद्यार्थी अन्न संपत आल्यामुळे चिंतेत आहेत. त्यांना माहित नाही की कधी त्यांची सुटका केली जाईल, त्यामुळे त्यांच्यात भीतीचं वातावरण पसरल्याचंही जेडनच्या आईचं म्हणणं आहे. भारतीय दूतावास त्यांच्या संपर्कात असला तरीही लवकरात लवकर युक्रेनमधून बाहेर काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेडनसह अन्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी विद्यापीठाकडून 22 फेब्रुवारीला परवानगी मिळाली. यानंतर लागलीच त्यांनी तिकीटंही बुक केली मात्र तोपर्यंत रशियाने (Russia) आक्रमण केलं आणि हवाईसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी अजूनही ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT