Russia-Ukraine Conflict  Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या चिंतेने पालक त्रस्त

आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी मेल पाठवून केली मदतीसाठी विनंती

दैनिक गोमन्तक

मडगाव : सध्या युक्रेनमध्ये युद्ध पेटले असून तिथे गोव्यातील काही विद्यार्थी अडकून पडल्याने त्यांच्या पालकांना चिंतेने ग्रासले आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूप गोव्यात आणण्याची व्यवस्था करावी अशी गोवा एनआरआय आयुक्त कार्यालयात मागणी वाढू लागली आहे. आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी मेल पाठवून मदतीची विनंती केली आहे. (Russia-Ukraine Conflict News Updates)

सुमारे सात पालकांनीही आमच्याकडे संपर्क साधला आहे. युक्रेनमध्ये असलेले बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले होते अशी माहिती एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली. दरम्यान आपचे (Aam Aadmi Party) युवा आघाडीचे राज्य निमंत्रक सिद्धेश भगत यांनी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयाला पत्र पाठवून या विद्यार्थ्यांची मदत करण्याची याचना केली आहे. या विद्यार्थ्यांचे (Students) पालक त्यांच्या चिंतेने ग्रासले आहेत असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील 137 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियापासून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओ संदेशात राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियाला त्यांना मारायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

SCROLL FOR NEXT