Gold From Mushrooms Dainik Gomantak
गोवा

Gold From Mushrooms: आळंबीपासून मिळणार सोन्याचे कण; गोव्यातील संशोधकांचे मोठे संशोधन

Gold From Mushrooms: वारुळावर उगवणारे हे आळंबी टर्मिटोमाइसेस प्रजातीचे असून, स्थानिक लोक त्यांना 'रान ओल्मी' म्हणतात.

Pramod Yadav

Gold From Mushrooms

निसर्गत: उपलब्ध होणाऱ्या आळंबीपासून सोन्याचे सुक्ष्म कण तयार करता येतील, असे महत्वपूर्ण संशोधन गोव्यातील डॉ. सुजाता दाबोळकर यांनी केले आहे. या कणांचा कर्करोगासाठी उपयोग होणाऱ्या औषधांमध्ये देखील वापर करता येऊ शकणार आहे.

वारुळावर उगवणारे हे आळंबी टर्मिटोमाइसेस प्रजातीचे असून, स्थानिक लोक त्यांना 'रान ओल्मी' म्हणतात. दाबोळकर यांनी गोवा विद्यापीठात याबाबत संशोधन केले आहे.

डॉ. सुजाता दाबोळकर यांना या संशोधनात डॉ.नंदकुमार कामत यांनी मार्गदर्शन केले. अलिकडेच राज्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासमोर हा शोधनिबंध सादर करण्यात आला.

टेलर आणि फ्रान्सिस यांनी प्रकाशित केलेल्या जर्नल ऑफ जिओमायक्रोबायोलॉजीमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

एक लिटर अळंबीच्या गोळ्यांमधून 01 ग्रॅम सुक्ष्म कण तयार करता येऊ शकतात, यासाठी सरासरी 100 रुपये येऊ शकतो, अशी माहिती डॉ.नंदकुमार कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संशोधकांनी गोव्याला या शोधातून आर्थिक लाभ मिळू शकतो असे म्हटले आहे. याचा वैद्यकीय क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे.

रुग्णाला कोणतेही औषध द्यायचे असल्यास ते नॅनोपार्टिकलवर ठेवून शरीरात पाठवता येईल. संशोधन औषध वितरण, वैद्यकीय इमेजिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात क्रांती घडवेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत खूप जास्त आहे. फेब्रुवारी 2016 पर्यंत, एक मिलिग्राम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत अंदाजे 80 डॉलर होती, जी प्रति ग्रॅम 80,000 डॉलरच्या समतुल्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT