Goan fishermen caught in trap of problems Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मच्छीमार अडकले समस्‍यांच्‍या ‘जाळ्यात’!

चोरट्यांकडून उपद्रव : होडीवरील सात यंत्रणा चोरीस, अद्याप थांगपत्ता नाही

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा येथील मच्छीमार व्यावसायिकांची एकूण 7 यंत्रणा चोरीस गेल्‍या आहेत. मच्छीमारांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्‍या, तरीही अद्यापपर्यंत त्‍यांचा तपास लागला नाही. होडीवरील एका यंत्रणेची किंमत 1 लाख 20 हजार रुपये अशी आहे. तसेच तौक्ते वादळावेळी झालेली नुकसानी अद्यापपर्यंत सरकारने मिळवून न दिल्याने मच्छीमार व्‍यावसायिकांनी नाराजी व्‍यक्त केली आहे.

मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या झोपड्या आणि होड्या आहेत. त्या झोपड्या, होड्याना तौक्ते वादळाचा तडाखा बसला होता. किनारी भागात मच्छीमारांसाठी निवाराशेड उभारावी, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, सरकारने त्‍याकडे दुर्लक्षच केले. तसेच जेटीसुद्धा बांधून दिली नाही.

जेटीविना मच्छीमारी व्‍यवसाय

तेंबवाडा व विठ्ठलदासवाडा किनारी भागातील मासेमारी व्यावसायिकांच्या झोपड्या व होड्यांना धोका निर्माण झाला आहे. येथील किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप दरवर्षी होत आहे. येथील झोपड्यांत मच्छीमारबांधव मासेमारीचे साहित्‍य आणि होड्या नांगरून ठेवतात. यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची धूप झाल्यामुळे होड्यांना आणि झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. होड्या सुरक्षित ठेवण्‍यासाठी जागा नसल्‍याने दरवर्षी नुकसान सोसावे लागत आहे. आता तरी सरकारने मच्छीमारांच्‍या मागण्‍यांची दखल घेऊन जेटी व निवाराशेड उभारण्‍यात यावी, अशी मागणी आल्बर्ट फर्नांडिस यांनी केली आहे.

किनारे असुरक्षित?

पेडणे तालुक्यातील किनारे आता स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांना सुरक्षित राहिलेले नाहीत. परप्रांतीयांनी अतिक्रमण करून आपल्या व्यवसायाचे बस्तान मांडलेले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार व्यावासायीकाना सुरक्षित जागाच उपलब्ध नाही. वीस - पंचवीस वर्षांचा काळ लक्षात घेतला तर किनारी भागात शेकडो लहान मोठ्या होड्या आणि झोपड्या मच्छीमारांच्या होत्या. तसेच मोठ्या रापणी किमान पेडणे तालुक्यात चार पाच होत्या. मोठ्या प्रमाणात रापणीला मासे मिळायचे. त्या काळात मासे बैलाच्या गाडीतून न्यायचे. तर काही मासे नारळाच्या झाडांना खत म्हणून वापर केला जात असे. किनारी मोठ्या प्रमाणात मासे वाळत टाकून खत करण्यासाठी गुजरात येथे पाठवले जायचे, तो काळ इतिहास जमा झाला. त्यावेळी मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकंच्या होड्याना आणि जाळी वाळत घालण्यासाठी सुरक्षित जागा होती, आता किनारे पर्यटनाच्या नावावर अतिक्रमण करून व्यापले गेले, मासेमारी करणाऱ्याना आता जागाच शिल्लक नाही, अशी व्‍यथा मच्छीमार बांधवांनी व्‍यक्त केली.

...तर पारंपरिक मच्छीमार व्‍यवसाय संकटात

मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात मच्छीमार व्यावसायिक पारंपारिक पद्धतीने काटाळी, पाग्यार, रापण वेणीद्वारे मच्छीमार व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. खारवी समाजाकडील हा व्यवसाय आता इतर समाजाने ताब्यात घेऊन या व्यवसायातही प्रचंड प्रमाणात स्पर्धा सुरू केली आहे. त्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने हा पारंपरिक व्यवसायही धोक्यात आला आहे. मच्छीमार समाजाने आजपर्यंत समुद्रकिनारे सुरक्षित ठेवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT