Goa Delhi Flight Dainik Gomantak
गोवा

Goa Delhi Flight: दाट धुक्याचा फटका; गोव्यातून दिल्लीला निघालेली फ्लाईट अहमदाबादला केली डायव्हर्ट

Goa Delhi flight diverted: जयपूर विमानतळावर अगोदरच गर्दी असल्याने फ्लाईट जयपूरला वळविण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातून दिल्लीला निघालेल्या एअर इंडिया कंपनीच्या विमानाला दाट धुक्याचा फटका बसला आहे. राजधानीत असेलल्या दाट धुक्यामुळे ही फ्लाईट गुजरातच्या अहमदाबादमध्ये लँड करण्यात आली. दृष्यमानता कमी असल्यामुळे फ्लाईट डायव्हर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरुन एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने रविवारी (२८ डिसेंबर) रात्री ११.५५ वाजता उड्डाण घेतले. ही फ्लाईट दिल्ली विमानतळावर पहाटे २.३५ वाजता लँड होणार होती.

पण, दाट धुक्यामुळे फ्लाईट अहमदाबादला डायव्हर्ट करण्यात आली. जयपूर विमानतळावर अगोदरच गर्दी असल्याने फ्लाईट जयपूरला वळविण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

सोमवारी देखील राजधानी दिल्लीत दाट धुक्याचा चादर पाहायला मिळत असून, यामुळे अनेक विमानाची उड्डाणे व लँडिंगला अडथळा निर्माण झाला आहे. खराब वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाने विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिल्लीत दाट धुक्याची शक्यता वर्तवली असून, ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

दाट धुक्यामुळे विमानांची ये – जा याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्पष्ट केले आहे. काही फ्लाईट रद्द देखील होण्याचा अंदाज विमानतळाने म्हटले आहे. कॅट ३ प्रणालीनुसार विमानतळावरील कामकाज चालत असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT