Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: मनोज परब आणि सरदेसाईंना हव्या असणाऱ्या जागा वगळता काँग्रेसची यादी फायनल, लवकरच होणार जाहीर; पाटकरांनी स्पष्टच सांगितलं

Goa ZP Election Seat Sharing: जागावाटपाचा तिढा कायम असला तरी, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्ष आपल्या स्तरावर तयारी करत असल्याचे स्पष्ट केले.

Manish Jadhav

Goa ZP Election Seat Sharing: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे समविचारी पक्षांसोबत युतीचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रयत्नांना मोठा धक्का बसला. सोमवारी (24 नोव्हेंबर) झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि रिव्होल्युशनरी गोअन्स (RGP) या पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम राहिला.

साडेतीन तासांच्या बैठकीत मतभेद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे साडेतीन तास ही बैठक चालली. मात्र, युतीतील जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. या बैठकीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांमुळे निर्माण झाला. रिव्होल्युशनरी गोअन्स (RGP) पक्षासोबत युती करण्यावरुन काँग्रेसच्याच काही वरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. या विषयावरुन बैठकीत बराच वाद-प्रतिवाद झाल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि इतर दोन्ही पक्षांना त्यांच्या प्रमुख नेत्यांसाठी हव्या असलेल्या जागांवरही एकमत होऊ शकले नाही.

काँग्रेसची अंतिम यादी लवकरच

जागावाटपाचा तिढा कायम असला तरी, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्ष आपल्या स्तरावर तयारी करत असल्याचे स्पष्ट केले. पाटकर म्हणाले, "मनोज परब (Manoj Parab) आणि विजय सरदेसाई यांना हव्या असलेल्या जागा वगळता आम्ही इतर सर्व उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली. आम्ही लवकरच ही संपूर्ण यादी जाहीर करु." पाटकर यांनी पुढे सांगितले की, "आम्ही काल रात्री आमच्या एका आघाडी भागीदारासोबत बैठक घेतली आणि आज दुसऱ्या भागीदाराला भेटणार आहोत."

या बैठकांमधून मार्ग काढून भाजपविरोधी (BJP) एकजुटीचे चित्र निर्माण करण्यात काँग्रेस आणि मित्रपक्ष यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT