Goa ZP Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'युती करणार नाही, इतरांना करू देणार नाही' मनोज परब यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा; ये तुकाराम को चाहिये क्या?

Congress RGP alliance: दोन्ही पक्षांमधील युती जवळजवळ संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे

Akshata Chhatre

RGP Manoj Parab Facebook Post: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांवर अखेर पूर्णपणे पडदा पडला असं म्हणता येईल. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीनेही आपल्या उमेदवारांची दुसरी यादी त्वरित घोषित केली असून, यामुळे दोन्ही पक्षांमधील युती जवळजवळ संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाराआडच्या प्रवेशावरून मनोज परब यांचा काँग्रेसला प्रश्न

युती तुटल्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब आता काँग्रेसवर नवा दबाव टाकताना दिसत आहेत. आपल्या फेसबुक पोस्टद्वारे परब यांनी थेट काँग्रेसला प्रश्न विचारला आहे. युतीमध्ये सामील होण्यासाठी आलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) मार्फत काँग्रेस आपल्या पक्षांतर केलेल्या आमदारांना पुन्हा प्रवेश देणार का, असा त्यांचा रोख आहे. मनोज परब यांच्या पोस्टनुसार, ते काँग्रेस आणि गोवा फरवर्ड पार्टी यांच्या संभाव्य युतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

'इसिडोर फर्नांडिस' यांच्या नावाचा वापर करत 'पोटशॉट'

परब यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माजी काँग्रेस आमदार इसिडोर फर्नांडिस यांचे नाव घेतले आहे. इसिडोर फर्नांडिस हे जुलै २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेल्या दहा बंडखोर काँग्रेस आमदारांपैकी एक होते आणि आता त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

या पार्श्वभूमीवर परब यांनी काँग्रेसला विचारले आहे की, 'गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करून काँग्रेस आपल्याच पक्षांतर केलेल्या नेत्यांना दाराआडचा प्रवेश देणार आहे का?'एवढेच नाही, तर परब यांनी काँग्रेसला हाही प्रश्न विचारला की, इसिडोर फर्नांडिस यांच्या विरोधात काँग्रेसने दाखल केलेली आमदारकी रद्द करण्याची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे, ती आता काँग्रेस मागे घेणार का?

गोवा फॉरवर्ड -काँग्रेस युती रोखण्याचा प्रयत्न

राजकीय निरीक्षकांच्या मते, मनोज परब यांनी इसिडोर फर्नांडिस यांच्या नावाचा उपयोग करून घेतलेला हा 'पोटशॉट' हा केवळ काँग्रेसवर टीका करण्यासाठी नाही, तर जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवड पार्टी आणि काँग्रेसमध्ये युती होऊ नये यासाठी दबाव तंत्र म्हणून वापरला जात आहे.

रिव्होल्युशनरी गोवन्सची भूमिका स्पष्ट आहे की, पक्षांतर करणाऱ्यांना कोणत्याही मार्गाने युतीत प्रवेश मिळता कामा नये.

'फसवणूक' झाल्याचे सांगत उमेदवार जाहीर

या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की, काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर रिव्होल्युशनरी गोवन्सने काँग्रेसवर 'फसवणूक' केल्याचा आरोप केला होता. युतीच्या चर्चा फिसकटल्याचे जाहीर करत लगेचच आपल्या १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसरी यादी जाहीर करून त्यांनी आपले स्वतंत्र लढण्याचे इरादे स्पष्ट केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Vehicle Theft Case: गुन्हेगारी इतिहास नाही, मग कोठडी कशाला? वाहन चोरी प्रकरणात वकिलांचा जोरदार युक्तिवाद; 19 वर्षीय जेडन-गौरक्षला सशर्त जामीन

Indian Women's League: मैदानावर संघर्ष, पण नशिबाची साथ नाही! सेझा अकादमीच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकने वाढले गोव्याचे टेन्शन

Goa Chicken Prices: 'पार्टी अभी बाकी है'... पण बजेटचं काय? मासळीपाठोपाठ आता चिकनच्या दरातही मोठी वाढ, खवय्यांच्या जिभेला लगाम

Valpoi Illegal Liquor Sale: रस्त्याकडेलाच रंगतायेत 'ओपन बार'! वाळपईत मद्यपींचा उच्छाद; प्रशासकीय यंत्रणा कोमात, तस्कर जोमात

Goa Drug Bust: सापळा रचला अन् शिकार टप्प्यात आली! अंमली पदार्थांचे जाळे पसरवणारे परप्रांतीय जेरबंद; वाळपई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT