Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Goa Zilla Panchayat Election: बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यातील एक म्हणजे वेळ्ळी मतदारसंघात एका मतदान केंद्राची वाढ करण्यात आली तर मुरगावातील दोन मतदान केंद्रे रद्द करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: दक्षिण गोव्यातील मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मतदान कचेरीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कचेरीत बैठक झाली.

या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यातील एक म्हणजे वेळ्ळी मतदारसंघात एका मतदान केंद्राची वाढ करण्यात आली तर मुरगावातील दोन मतदान केंद्रे रद्द करण्यात आली. बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा अहवाल पणजीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविला जाईल.

या बैठकीत सर्वप्रथम जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांनी २८ जुलै २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबरच्या बैठकीत सुसूत्रता प्रक्रियेबद्दल जी चर्चा झाली होती त्याची माहिती सादर केली. निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) व साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांनी मुरगाव, कुठ्ठाळी, कुंकळ्ळी, वेळ्ळी व सावर्डे मतदारसंघांसंदर्भात जे प्रस्ताव दिले त्यांच्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली मान्यता दिली, असे जिल्हाधिकारी कचेरीतील प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

काही केंद्रे दुसरीकडे हलविण्याचा निर्णय

वेळ्ळी मतदारसंघात मतदान केंद्र म्हणून क्र. १९ या नव्या केंद्राला मान्यता देण्यात आली.

मुरगाव मतदारसंघातील क्र. ४ व ५ ही मतदान केंद्रे मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या कॉलनी व क्वॉटर्स पाडल्याने रद्द करण्यात आली.

कुठ्ठाळीतील ३९ व सावर्डेतील ४७ क्रमांकांची मतदान केंद्रे दुसरीकडे हलविण्याच्या निर्णय घेण्यात आला.

मुरगाव, कुठ्ठाळी, कुंकळ्ळी, वेळ्ळी व सावर्डे मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे वगळल्याने तसेच नवीन मतदान केंद्रे उघडल्याने विभाग किंवा मतदान क्षेत्रातील बदल, कलमांच्या नामनिर्देशनात बदल व मतदान केंद्रांचे बदललेले क्रमांक यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

अलिप्त राहण्याचा चर्चिल यांचा निर्णय

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सासष्टीतील नेत्यांची भूमिका काय, हा प्रश्न चर्चेत असताना माजी मुख्यमंत्री आणि बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी आपण या निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची कन्या वालंका आलेमाव याही या निवडणुकीत नावेली मतदारसंघात लक्ष घालणार नाहीत.

बाणावली मतदारसंघात कोलवा आणि बाणावली असे दोन मतदारसंघ येतात; पण या दोन्ही मतदारसंघांत मी माझे उमेदवार उभे करणार नाही किंवा अन्य कुठल्या उमेदवाराला पाठिंबाही देणार नाही. वालांकाही नावेली मतदारसंघात लक्ष घालणार नाही.

लोकांना काय हवे ते त्यांना करण्याची मी मोकळीक देणार आहे, असे आलेमाव म्हणाले. कुडतरी विधानसभा मतदारसंघात कुडतरी आणि राय असे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ येतात. मात्र, यावेळी आपण फक्त कुडतरी मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी जाहीर केले आहे. तर नुवे मतदारसंघाबद्दलची आपली भूमिका या मतदारसंघाचे माजी आमदार मिकी पाशेको आणि बाबाशान डिसा या दोघांनीही स्पष्ट केलेली नाही.

दुसऱ्या बाजूने आम आदमी पार्टीने सासष्टीतील सर्व ९ मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचे निश्चित करून बाणावली, कोलवा व वेळ्ळी या तीन मतदारसंघांचे आपले उमेदवार जाहीर केले असून आमदार व्हेन्झी व्हिएगस आणि आमदार क्रूज सिल्वा यांनी प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी अजून आपले पत्ते खुले केलेले नाहीत. भाजपनेही सर्व ९ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

फॉरवर्डतर्फे काजल गावकर

जिल्हा पंचायतीच्या शिरोडा मतदारसंघासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवार म्हणून काजल विशांत गावकर यांची निवड झाली असून गुरुवारी (ता.२०) त्यांनी गोवा फॉरवर्डचे आमदार तथा अध्यक्ष विजय सरदेसाई व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देवी कामाक्षीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे दुर्गादास कामत, अकबर मुल्ला तसेच विशांत गावकर व इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देवी कामाक्षीच्या मंदिरात नारळ ठेवून प्रचाराला प्रारंभ केला.

यावेळी विजय सरदेसाई यांनी भाजपला आता सत्तेबाहेर फेकण्याची आवश्‍यकता असून सर्वांच्या सहकार्याने हे काम होणार आहे. गोवा फॉरवर्ड हा गोमंतकीयांचा स्वतःचा पक्ष असून गोमंतकीयांच्या हितासाठी आणि गोव्याच्या विकासासाठी वावरणारा पक्ष आहे, त्यामुळे शिरोडा मतदारसंघातून यावेळेला गोवा फॉरवर्ड पक्षाला नक्कीच विजय मिळेल, असे सांगितले.

विशांत गावकर यांनी गोवा फॉरवर्डकडून गोमंतकीयांना अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे नेते विजय सरदेसाई कार्यरत असून सर्वांच्या सहकार्याने निश्‍चितच विजय मिळेल, असे सांगितले.

पुढील आठवड्यापर्यंत उमेदवार यादी जाहीर करू

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप सर्व पन्नासही मतदारसंघांत आपले उमेदवार ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे पक्षाने घेतलेली आहेत.

कार्यकर्त्यांकडे चर्चा केली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मडगावात पत्रकारांकडे बोलताना स्पष्ट केले. काही मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा की नाही याचा निर्णय अजून झाला नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. संभाव्य उमेदवारांच्या नावांवर राज्य समिती निर्णय घेणार आहे.

याची एक फेरी पूर्ण झाली आहे. उमेदवार निश्चित करताना त्या उमेदवाराचा अनुभव, त्या मतदारसंघातील आमदाराची ताकद, कार्यकर्त्यांचे म्हणणे, गाभा समितीचे म्हणणे याचा विचार केला जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी केंद्रीय पक्षनेत्यांना पाठवली जाईल, असेही नाईक यानी सांगितले.

आरक्षणानुसार महिलांना उमेदवारी दिली जाईल. शिवाय उमेदवारांची जिंकण्याची ताकद व त्या मतदारसंघातील परिस्थिती व जे सर्वेक्षण केले आहे, त्या अहवालाचा विचारही उमेदवार निवडीवेळी होईल. पुढील आठवड्यापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असेही नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT