पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने आणखी दहा उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. याआधी दोन दिवसांपूर्वी १९ जणांची यादी जाहीर करण्यात आली होती. उर्वरित २१ उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
यावेळच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे देण्याचा निर्णय भाजपने अगोदरच घेतला होता. त्यानुसार पहिल्या यादीतून ८० टक्के नवे चेहरे देण्यात आले. दुसऱ्या यादीतीलही अनेकजण नवखे असून, उर्वरित मतदारसंघांतही नव्या चेहऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. त्या २१ उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. अंतिम मुदत ९ डिसेंबरपर्यंत देण्यात आली असून, बुधवारपासून भाजप उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
हरमल मनिषा कोरकणकर
शिवोली महेश गोवेकर
हळदोणा सुभाष मोरजकर
हणजूण नारायण मांद्रेकर
चिंबल गौरी कामत
सेंट लॉरेन्स पावलिना ऑलिव्हेरा
धारबांदोडा रूपेश देसाई
रिवण राजश्री गावकर
बार्शे अंजली वेळीप
पैंगीण अजित लोलयेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.