Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: मानवी तस्करी, ड्रग्स, दारूच्या तस्करीचे गोवा ‘ट्रान्सिट हब’, भाजप सरकारच्या आशीर्वादानेच गोव्याचे नुकसान- आलेमाव

युरी यांचा आरोप : कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकारने गोव्याला मानवी तस्करी, ड्रग्ज, प्रदूषणकारी आणि घातक पदार्थांची वाहतूक आणि दारूची तस्करी करणारे ‘ट्रान्सिट हब’ बनविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी हा आरोप केला आहे.

गोव्यातून कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या दारूची तस्करी होत आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय उत्तर देतील, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

कर्नाटकात आजही भ्रष्ट भाजप सरकारच राज्य करत असल्याचा भास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना होत असावा. कर्नाटकातील जनतेने भ्रष्टाचार संपवण्यासाठी काँग्रेसचे सरकार निवडून दिले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोव्यातून कर्नाटकात होणारी दारूची तस्करी थांबवावी, असे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री सावंत याची दखल घेऊन दारूमाफियांवर कारवाई करतील का? असा सवाल आलेमाव यांनी केला आहे.

कर्नाटकात भाजपचे सरकार असताना गोव्यातून अवैध दारूच्या वाहतुकीकडे भाजप सरकारने जाणीवपूर्वक डोळेझाक केली, हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा आशीर्वाद असलेल्या दारू माफियांना मदत करण्यासाठी गोव्याच्या आर्थिक नुकसानाकडे दुर्लक्ष केले.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT