Goa CM Pramod Yadav Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Festival: सर्वण-डिचोलीत गोवा युवा महोत्सवाला सुरुवात; मुख्यमंत्री सावंतांना अखेरच्या क्षणी निमंत्रण

Goa Youth Festival 2025: तरुणाईच्या कला-गुणांना वाव देणाऱ्या दोन दिवसीय गोवा युवा महोत्सवाचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शनिवारपासून २६ व्या गोवा युवा महोत्सवाला सर्वण-डिचोली येथे उत्साहात प्रारंभ झाला. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्याबाबत आयोजकांनी निष्काळजीपणा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनाही व्यासपीठावर स्थान देण्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे लक्ष वेधले. युवा जैतिवंत, डिचोली आणि झांट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणी भाषा मंडळातर्फे सर्वण येथील झांट्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरुणाईच्या कला-गुणांना वाव देणाऱ्या दोन दिवसीय गोवा युवा महोत्सवाचे शनिवारी (ता. २५) मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते कवाथ्याला पाणी घालून उदघाटन करण्यात आले.

यावेळी विशेष अतिथी आमदार प्रेमेंद्र शेट आणि स्वागताध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष रत्नमाला दिवकर, कार्याध्यक्ष कलानंद कामत बांबोळकर, महोत्सव संयोजिका मानसी पावसकर, तन्वी पळ आणि मान्यवर उपस्थित होते. उदघाटनानंतर उपस्थितांना संबोधित करून मुख्यमंत्री निघून गेले.

कोकणीच्या प्रेमापोटी उपस्थित राहिलो : मुख्यमंत्री

महोत्सवाच्या काही तास अगोदरच 'आज सकाळीच मला या महोत्सवाचे निमंत्रण मिळाले' असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगत महोत्सवाचे उदघाटन केले. मात्र, झाल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असली, तरी केवळ कोकणी भाषेच्या प्रेमापोटी अहंकार बाजूला ठेवून महोत्सवाला उपस्थित राहिलो, असे स्पष्ट करून त्यांनी आयोजकांची बोलतीच बंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT