Goa Youth Congress Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Congress Protest: हातात सिलिंडर, गळ्यात बटाटे- टोमॅटोच्‍या माळा; युवक काँग्रेसचा धडक मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक मोर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Youth Congress Protest कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात झालेली अन्यायकारक कारवाई, वाढलेली महागाई आणि बेरोजगारी या विरोधात मंगळवारी युवक काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले होते. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या आल्‍तिनो-पणजी येथील निवासस्थानावर युवक काँग्रेसने धडक मोर्चा काढला.

गळ्यात बटाटे, टोमॅटोच्‍या माळा, हातात सिलिंडर घेऊन मोर्चात कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न विचारण्यास गेलेल्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सोडून दिले.

युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करण्‍यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोमॅटो, कांदा, मिरची यांचे हार गळ्यात घातले होते, काहींनी ते हार डोक्यावर बांधले होते.

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव रिचा भार्गव, विजय भिके, एहराज मुल्ला, ‘एनएसयूआय’चे नौशाद चौधरी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग होता.

आझाद मैदानावरून घोषणाबाजी सुरू करत हा मोर्चा आल्तिनोवरील मुख्यमंत्री निवासस्थानाकडे आला. महालक्ष्‍मी बंगल्‍यानजीक शंभर मीटर अंतरावर मोर्चा अडविण्‍यात आला.

त्याठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून काही पदार्थ तयार केले. ते पदार्थ मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले. पण पोलिसांनी त्यांना रोखले.

यावेळी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव रिचा भार्गव, यांच्यासह विवेक डिसिल्वा, जीना परेरा, जिल्हा उपाध्यक्ष साईश आरोसकर, उबेदुल्ला खान, लिओविटा आंद्राद्र, एहराज मुल्ला, रिनाल्डो रुझारियो, वैष्णव पेडणेकर, महेश नादर, रायन लोबो, मौला अली, जावेद शेख, समीर अहमद एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी, रिहान खान, जुनेद सईद, अक्षय नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील काहींना पेडणे पोलिस ठाण्यात नेले आणि प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सोडले.

सरकारी ’दादागिरी’चा निषेध

महागाई आणि बेरोजगारीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाब विचारायला गेलेल्या युवक काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याबद्दल युवक काँग्रेसने त्यांचा निषेध केला.

यावेळी रिचा भार्गव म्हणाल्या की, भाजप सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचे आज सिद्ध झाले आहे. या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का?

हेच का ते ‘अच्छे दिन’?

भाजपचे सरकार युवकांना नोकऱ्यांचे आमिष दाखविते. सध्या बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे युवकांमध्ये तीव्र संताप आहे. राज्य सरकारने तीन सिलिंडर मोफत देणार, असे सांगून जनतेची फसवणूक केली आहे.

महागाई वाढतच चालली असून टोमॅटो 150 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे भाजप सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT