Goa Youth Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Congress : गोवा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी युवा चेहरे

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही यांनी जाहीर केली नियुक्ती

Rajat Sawant

गोवा काँग्रेसने युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाची नावे जाहीर केली आहेत. अध्यक्षपदी ज्योएल आंद्रादे तर उपाध्यक्षपदी विवेक डिसील्वा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही यांनी ही नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती गोवा प्रदेश युवक काँग्रेसने ट्वीट करत दिली.

आंद्रादे हे पणजीत काँग्रेसचे नगरसेवक असून आता त्यांची वर्णी गोवा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी लागली आहे. विवेक डिसील्वा हे उत्तर गोवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आता त्यांची वर्णी गोवा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी लागली आहे. याबाबतचे पत्र भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही यांनी जाहीर केले.

प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तुमची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही कठोर परिश्रम कराल. तुमचा पूर्ण वेळ आणि शक्ती काँग्रेस पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली समर्पित कराल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Live News: कूटबण जेट्टीवर आढळले कॉलराचे सहा रुग्ण

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

SCROLL FOR NEXT