37th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: आकांक्षा अंतिम फेरीत, वुशू खेळात तिसरे पदक

National Games 2023: गोव्याला वुशू खेळात रौप्यपदक मिळाले. शेरबहादूर याने 8.85 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.

दैनिक गोमन्तक

National Games 2023: अमेरिकेत प्रशिक्षण घेणारी महिला स्क्वॉश खेळाडू आकांक्षा साळुंखे हिने क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या खास निमंत्रणावरून 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले. तिने विश्वास सार्थ ठरविताना शनिवारी चिखली-वास्को येथील क्रीडा संकुलात महिला गटात अंतिम फेरी गाठून सुवर्ण अथवा रौप्यपदक निश्चित केले. तिची अंतिम लढत रविवारी होईल.

गोव्याला वुशू खेळात रौप्यपदक मिळाले. शेरबहादूर याने ८.८५ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. या खेळात गोव्याला आता दोन रौप्य व एका ब्राँझसह तीन पदके मिळाली आहेत.

मिनी गोल्फ पदके प्रात्यक्षिक गटात

गोव्याने मिनी गोल्फ या नव्या खेळात शुक्रवारी एक सुवर्ण व एक ब्राँझपदक जिंकले होते, मात्र शनिवारी गोव्याचा अधिकृत पदके जाहीर करताना स्पर्धा आयोजकांनी ही पदके गृहीत धरली नाहीत. मिनी गोल्फ हा प्रात्यक्षिक खेळ असल्याने दोन्ही पदके गोव्याच्या खाती जमा झाली नसल्याचे नमूद करण्यात आले.

गोव्याची एकूण पदके 48

  • 10 सुवर्ण

  • 12 रौप्य

  • 26 ब्राँझ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT