Women's T20 Cup Cricket पावसाचा व्यत्यय आल्यानंतर व्हीजेडी पद्धतीनुसार विदर्भाला 12 धावांनी हरवून गोव्याच्या सीनियर महिला संघाने छत्तीसगड महिला टी-20 कप क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदविला आणि थाटात अंतिम फेरीतही प्रवेश केला. सामना शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला.
विदर्भाने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोव्याचा डाव १०८ धावांत गुंडाळला गेला, पण नंतर विदर्भाचीही नवव्या षटकात 4 बाद 29 धावा अशी घसरगुंडी उडाली.
यावेळी पावसाला सुरवात झाली व नंतर खेळ होऊ शकला नाही. या स्थितीत व्हीजेडी पद्धतीनुसार गोव्याचा महिला संघ १२ धावांनी पुढे होता व त्यांना या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.
गोव्याची स्थिती 4 बाद 36 अशी नाजूक असताना महत्त्वपूर्ण ३२ धावा करून संघाला सावरणारी प्रियांका कौशल सामन्याची मानकरी ठरली. विदर्भाच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर शिखा पांडे हिने गोव्याला पहिले यश मिळवून दिले.
नंतर पूर्वा भाईडकर हिने तिसऱ्या षटकात विकेट मिळविल्यामुळे विदर्भाची स्थिती 2 बाद 6 धावा अशी झाली. पाऊस सुरू होण्यापूर्वी दीक्षा गावडे हिने चार चेंडूंत दोन विकेट टिपल्यामुळे विदर्भाचा डाव 4 बाद 26 धावा असा गडगडला.
संक्षिप्त धावफलक
गोवा महिला: १९.१ षटकांत सर्वबाद १०८ (पूर्वजा वेर्लेकर १२, तरन्नूम पठाण १३, सुनंदा येत्रेकर २, शिखा पांडे १०, श्रेया परब ०, प्रियांका कौशल ३२, विनवी गुरव २२, पूर्वा भाईडकर २, तनया नाईक ०, दीक्षा गावडे १, निकिता मळीक नाबाद ४, गार्गी वाणकर २-०-२४-२, आर्या गोहाने ३-०-१२-३, नुपूर कोहाळे ४-०-२०-३) वि. वि. विदर्भ ः ८.४ षटकांत ४ बाद २९ (लतिका इनामदार नाबाद १०, शिखा पांडे ३-०-५-१, पूर्वा भाईडकर २-०-१४-१, तरन्नुम पठाण २-०-८-०, दीक्षा गावडे १.४-१-१-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.