Women Reservation Bill Dainik Gomantak
गोवा

Women Reservation Bill: ...तर महिला आरक्षणासाठी 2031ची वाट पहावी लागेल: आलेमाव

जनगणनेनंतरच मतदारसंघांचे नवीन सीमांकन होऊ शकते. त्यामुळे आरक्षण लागू होण्यास विलंब होईल

गोमन्तक डिजिटल टीम

Women Reservation Bill विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे म्हटले आहे. पण, प्रत्यक्षात गोव्यातील महिलांना आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी 2031 ची वाट पाहावी लागेल, अशीही टीका त्यांनी केली आहे.

कारण जनगणनेला आधीच उशीर झाला आहे. जनगणनेनंतरच मतदारसंघांचे नवीन सीमांकन होऊ शकते. त्यामुळे आरक्षण लागू होण्यास विलंब होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जनगणनेच्या पहिल्या अहवालानंतर नवीन सीमांकन सुरू होईल.

याचा अर्थ महिला आरक्षण विधेयक २०३१ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभावी होऊ शकते. जर ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण मिळू शकते किंवा २०३१ च्या विधानसभा निवडणुकांची वाट पाहावी लागेल,'' असे युरी म्हणाले.

लाखो महिलांचा विश्‍वासघात

काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच हे विधेयक लवकरात लवकर लागू होईल, अशी पक्षाला आशा आहे. कृतीच्या मागील हेतू ती कृती चांगली किंवा वाईट हे ठरवत असते. भाजप सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक लाखो भारतीय महिला, मुली आणि इतर मागासवर्गीयांच्या आशांचा विश्वासघात आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळ्याची पोलिसचं चौकशी करणार, सरकार ठाम; संशयितांच्या आवळल्या जातायेत मुसक्या!

Goa Opinion: खराब रस्ते, विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अमली पदार्थाचे संकट; सुंदर, नितळ गोव्याची 'इमेज' धोक्यात

Pooja Naik Case: श्रीधर सतरकर यांना जीवन संपवण्यास भाग पाडणाऱ्या पूजा नाईकला 3 दिवसांची पोलिस कोठडी!

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा गलबला

South Goa Bar Association: राज्यातील वकिलांना संरक्षण द्या! दक्षिण गोवा वकील संघटनेची मागणी; हल्‍ल्‍यांची गंभीर दखल घ्यावी

SCROLL FOR NEXT