Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

WhatsApp Part Time Job Scam Goa: वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरत असताना एकूण ३,६९,४०० रुपये जमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: व्हॉट्स ॲपवर घरबसल्या पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून कोरगाव येथील २५ वर्षीय युवतीची ३ लाख ६९ हजार ४०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळवाडा-कोरगाव येथील एका युवतीला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामील करून घरातून करता येणाऱ्या पार्टटाईम नोकरीची ऑफर दिली. सुरवातीला काही कामे पूर्ण केल्यानंतर तिला थोडी रक्कम देण्यात आली. त्यामुळे विश्वास बसून तिने पुढील कामे स्वीकारली.

यानंतर कमावलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच, चुकीचा विथड्रॉल पर्याय निवडल्याचे सांगून अतिरिक्त पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बँक खात्याचा क्रमांक चुकीचा भरल्याचे कारण देत खाते ‘अनफ्रीझ’ करण्यासाठी २ लाख रुपये, तसेच क्रेडिट स्कोअर कमी असल्याचे सांगून आणखी १.४० लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले.

वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरत असताना एकूण ३,६९,४०० रुपये जमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने मांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अंतर्गत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्या!

व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सोशल मीडियावरील घरबसल्या पार्टटाईम नोकरीच्या आकर्षक ऑफरवर सहज विश्वास ठेवू नका. कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी किंवा कमावलेली रक्कम काढण्यासाठी पैसे भरण्याची मागणी होत असल्यास ती फसवणुकीची शक्यता समजा.

अनोळखी व्यक्तींना बँक खाते, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. संबंधित कंपनीची अधिकृत माहिती व नोंदणी पडताळूनच व्यवहार करा. संशयास्पद लिंक, ॲप किंवा ग्रुप टाळा. फसवणुकीचा संशय आल्यास तत्काळ व्यवहार थांबवून बँकेला आणि जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT