Woman injured due to Accident at Ladfe Village (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: लाडफे अपघातात महिला जखमी

पुलावर दुचाकी उसळल्याने अपघात (Goa)

तुकाराम सावंत

Bicholim: दोडामार्ग रस्त्यावरील लाडफे (Ladfe, Dodamarg Road) येथे पुलावरील गचक्यावर दुचाकी (A Bike) उसळून झालेल्या अपघातात स्कुटरचालक महिला जखमी झाली. हा अपघात (Accident) मंगळवारी (ता. 17) सायंकाळी लाडफे रस्त्यावरील भेडशीकोंड येथे छोट्या पुलावर घडला (Accident on Bridge). अपघातात स्कुटरचालक महिला जखमी (Woman Injured) झाली असून, 108 रुग्णवाहिकेतून (108 Ambulance) तिला उपचारार्थ डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात (Social Health Center, Bicholim) नेण्यात आले आहे. जखमी महिला पिळगाव परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.

गचक्यामुळे अपघात

पिळगाव येथील ही महिला आपल्या दुचाकीवरुन दोडामार्गच्या दिशेने जात होती. त्या एकट्याच होत्या. या रस्त्यावरील लाडफे येथील पुलाच्या पातळी रस्त्यापेक्षा काहीशी उंच आहे. त्यामुळे त्याठिकाणी वाहनांना गचके बसतात. असाच गचका बसल्याने दुचाकी उसळली आणि ही महिला दुचाकीसह रस्त्यावर आपटली. स्थानिक तसेच त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी अपघातग्रस्त महिलेला मदत केली. दरम्यान, या पुलावरील गचक्यामुळे अधूनमधून अपघात घडत असतात. अशी माहिती स्थानिकांनी देवून, पुलाकडील रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा.अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT