Goa: Mahadev Naik speaking at a press conference at AAP's office. Surel Tilve and Rahul Mhambare on the side.
Goa: Mahadev Naik speaking at a press conference at AAP's office. Surel Tilve and Rahul Mhambare on the side. Dainik Gomantak
गोवा

Goa: महादेव नाईक यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ

Yeshwant Patil

पणजी : माजी मंत्री महादेव नाईक (Former Minister Mahadev Naik) यांच्या आप (AAP) प्रवाशाने पक्षाला नवे बळ (Power) मिळाले आहे, असे प्रतिपादन आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे (Rahul Mahambre) यांनी व्यक्त केले. आपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत योगेश खांडेपारकर (Yogesh Khandeparkar), ॲड. सुरेल तिळवे (Adv. Surel Tilve), दिनेश बोरकर (Dinesh Borkar) उपस्थित होते.

यावेळी महादेव नाईक म्हणाले, आप राज्यातील राजकारणाला नवा आयाम देईल. महामारी, महापूर या संकटात पक्षाने जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे. त्यामुळेच या पक्षाची कास धरली आहे. राज्यातील तरुणांना बेरोजगारीची चिंता सतावत आहे. अनेक वर्षे भाजप राज्यात सत्तेत आहे, पण तरुणांच्‍या भवितव्याची तरतूद करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. आपने दिल्लीत विकासाचा नवा धडा दिला आहे. गोव्यातही ते शक्य आहे. सरकार केवळ तरुणांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन करते. प्रत्यक्षात मात्र तरुण आणि तरुणी रोजगारापासून वंचित आहेत. सरकारची कोणत्याच बाबतीत इच्छाशक्ती नाही. केवळ आप राज्याला नवी दिशा देईल, तसेच आप राज्याचा आवाज बनेल, असा दावा महादेव नाईक यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT