Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसतील

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची सूत्रे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे समजते.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची सूत्रे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे समजते. सावंत यांनी काल सकाळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यावर त्यांच्या गोव्यातील निकटवर्तीयांना काहीसा सकारात्मक संदेश त्यांच्या गोटातून देण्यात आला. गोव्यात सावंत यांचा 20 तारखेनंतर शपथविधी होणार आहे.

गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्येही एन. बीरेन सिंग यांच्याकडेच सत्तेची सूत्रे कायम ठेवण्यात येणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तेथील मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. मणिपूरमध्येही 20 मार्चनंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व प्रदेश संघटन सचिव सतीश धोंड, गोवा प्रभारी सी.टी. रवी उपस्थित होते. नंतर सावंत यांनी शहा आणि नड्डा यांच्याशीही चर्चा केली. त्याआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतही हे नेते सहभागी झाले होते. याच दरम्यान शहा यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल; पण मूळचे गोव्याचे असलेले राजेंद्र आर्लेकर यांच्याशीही या विषयावर चर्चा केली.

उपमुख्यमंत्रिपद रद्द

गोव्यात नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसतील, असे सांगण्यात आले. गोव्याच्या यापूर्वी 40 सदस्यीय विधानसभेत दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालीही भाजपला जास्तीत जास्त 13 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा पंतप्रधान मोदी यांचा चेहरा, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, शहा यांचे ‘मायक्रो’ व्यवस्थापन व मुख्य म्हणजे राज्यात सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वाधिक 20 जागा मिळविल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT