Plastic  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1 जुलैपूर्वी सिंगल यूज प्लॅस्टिकवर येणार बंदी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लॅस्टिक वस्तूंच्या उत्पादकांना जारी केलेली संमती आणि नोंदणी रद्द करण्याचे निर्देश राज्य प्रदूषण प्राधिकरणांना दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) गोव्यासह सर्व राज्य प्रदूषण प्राधिकरणांना प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, सर्व राज्यांच्या प्रदूषण प्राधिकरणांनी 1 जुलैपूर्वी राज्यांमध्ये (State) एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर (सिंगल यूज प्लॅस्टिक) संपूर्ण बंदी घालायची आहे. (Goa News)

सिंगल यूज प्लॅस्टिक (Plastic) वस्तूंच्या उत्पादकांना जारी केलेली संमती आणि नोंदणी रद्द करण्याचे निर्देश देखील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण प्राधिकरणांना (सीपीसीबी) दिले आहेत. सीपीसीबीने 1 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, "निर्धारित अटींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संस्थांना जारी केलेले व्यावसायिक परवाने रद्द करण्यात येतील"

गोवा राज्याने उचलेली पावले

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोवा (Goa) पर्यावरण विभागाने सर्व सरकारी विभाग, स्वायत्त संस्था,
कॉर्पोरेशन्स आणि स्थानिक प्राधिकारणांना एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.

सर्व सरकारी कार्यालयांना प्लॅस्टिक फुले, बॅनर, झेंडे, फुलांची भांडी, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक फोल्डर इत्यादी प्लास्टिक उत्पादनांचा वापर करण्यास परावृत्त करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT